पहाटे पावणेपाचला पोलिसांनी केली कारवाई –
पुणे-तळजाई टेकडीवर मॉर्निंग वॉकला येणा-या नागरिकांवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले सराईत गुन्हेगारांच्या सहकारनगर पोलिसांनी मुसक्या आवळ्या आहेत . बिकानेर चौकाकडुन तळजाई मंदीराकडे जाणारे रोडवरील कै. सदु शिंदे स्टेडीअमचे पुढे व सेल्फी पॉईटचे अलीकडे रस्त्याचे कडेला अंधारात दाबा धरून बसलेले ५ पैकी तिघेजण पोलिसांनी पकडले आहेत .अमर अनंत काथवटे, वय २६ वर्षे, रा.५४/२ आण्णाभाऊ साठे नगर अरण्येश्वर पुणे, ऋषीकेश उर्फ ऋषी राजु शिंदे वय २६ वर्षे, रा.५४/२ अण्णाभाऊ साठे नगर, अरणेश्वर पुणे , अभिजीत श्रावण चंदनशिवे, वय २६ वर्षे, रा. बी/१०४/२ व्हिआयटी कॉलेजजवळ अप्पर इंदीरानगर बिबवेवाडी पुणे अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत दोघेजण पळून जाण्यात यशस्वी झालेत लवकरच ते पोलिसांच्या तावडीत सापडतील असे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले कि,’ दिंनाक ०६/०६/२०२४ रोजी सहकारनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर कडील तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे सहकारनगर पोलीस स्टेशनचे हद्दीत चैन चोरी, मोबाईल चोरी, घरफोडी, इतर मालमत्तेविरुध्द गुन्हे घडु नये त्यास प्रतिबंध करुन कायदा व सुव्यवस्था राखणेकरिता व जनेतेचे मालमत्तेचे नुकसान होवु नये म्हणुन हद्दीत प्रतिबंधात्मक कारवाई करुन गुन्हेगारांना जेरबंद करण्याकरीता पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार अमोल पवार व नवनाथ शिंदे यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, बिकानेर चौकाकडुन तळजाई मंदीराकडे जाणारे रोडवरील कै. सदु शिंदे स्टेडीअमचे पुढे व सेल्फी पॉईटचे अलीकडे रस्त्याचे कडेला अंधारात काही इसम नागरीकांना लुटण्यासाठी दबा धरुन बसले असुन त्यांचेकडे लोखंडी हत्यार, लाकडी बांबु वगैरे हत्यारे आहेत. अशी खात्रीशीर बातमी मिळाली त्या बातमीचा आशय वरिष्ठांना कळवुन त्यांचे परवानगीने तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक युवराज पोठरे व तपास पथकातील स्टाफ बातमीप्रमाणे बातमीचे ठिकाणी जावुन वाहने पार्क करुन थोडे अलीकडे आडोशास थांबुन बॅटरीचे उजेडाने पाहणी केली असता तेथे पाच ते सहा इसम अंधारात लपुन बसुन एकमेकांशी हळु आवाजात बोलताना दिसुन आले. खात्री होताच पहाटे ०४.४५ वा. सदर ठिकाणी छापा टाकुन तेथे हजर असलेल्या इसमांना ताब्यात घेत असताना अंधाराचा फायदा घेवुन दोन इसम तेथुन पळुन गेले व तिन इसम मिळून आले. त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारता त्यांनी आपली नावे १) अमर अनंत काथवटे, वय २६ वर्षे, रा.५४/२ आण्णाभाऊ साठे नगर अरण्येश्वर पुणे २) ऋषीकेश उर्फ ऋषी राजु शिंदे वय २६ वर्षे, रा.५४/२ अण्णाभाऊ साठे नगर, अरणेश्वर पुणे ३) अभिजीत श्रावण चंदनशिवे, वय २६ वर्षे, रा. बी/१०४/२ व्हिआयटी कॉलेजजवळ अप्पर इंदीरानगर बिबवेवाडी पुणे अशी असल्याची सांगीतली. त्यांच्या ताब्यातुन १ लोखंडी हत्यार, स्प्रे, लाकडी बांबु, ०३ मोबाईल व ०१ अॅक्टीव्हा गाडी असा मुद्देमाल जप्त करुन त्यांना जेरबंद केले.
आरोपी यांच्याविरुध्द खुनाचा प्रयत्न, दरोडा, बेकायदेशीर हत्यार बाळगणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, दंगा, मारामारी, असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपींवर यापुर्वी मकोका कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. नमुद आरोपीकडे अधिक तपास करता तळजाई मंदिराजवळील टेकडीवर पहाटेच्या सुमारास मॉर्निंग वॉक करता येणाऱ्या नागरिकांना लुटण्यासाठी सदर ठिकाणी एकत्र जमलो असल्याचे सांगीतले नमुद आरोपी विरुध्द सहकारनगर पोलीस ठाणेत गुन्हा नोंद क्रमांक १९३/२०२४ भादंवि कलम ३९९, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५ व आर्म अॅक्ट कलम ४(२५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास युवराज पोठरे, पोलीस उप निरीक्षक, सहकारनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर हे करीत आहेत.सदरची कामगीरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ-२, श्रीमती स्मार्तना पाटील, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग श्रीमती नंदिनी वंग्याणी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहकारनगर पोलीस स्टेशन, सुरेंद्र माळाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) उत्तम भजनावळे, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक युवराज पोठरे, सहा. पोउपनिरी बापु खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, नवनाथ शिंदे, सागर सुतकर, किरण कांबळे, बजरंग पवार, महेश मंडलिक, अमित पद्माळे, विशाल वाघ, सागर कुंभार यांनी केली आहे.
