पुणे, दि. ६: पर्वती येथील सैनिकी मुलांचे वसतिगृह व नवी पेठ येथील सैनिकी मुलींचे वसतिगृह येथे २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली असून माहिती पत्र व प्रवेश अर्ज संबंधित वसतिगृहात १० जूनपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने दिली आहे.
या दोन्हीही वसतिगृहात इच्छुक युद्धविधवा, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, माजी व कार्यरत सैनिक यांनी त्यांच्या पाल्यासाठी संबंधित वसतिगृहातून प्रवेश अर्ज व माहिती पत्रक घेवून आवश्यक त्या कागदपत्रासह परिपूर्ण अर्ज वसतिगृह अधीक्षक, अधीक्षिका यांच्याकडे १५ जुलैपर्यंत जमा करावेत.
विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेस विलंब होत असल्यास वसतिगृह प्रवेश अर्ज जमा करण्याची तारीख वाढवून देण्यात येईल, असेही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल एस.डी. हंगे (नि.) यांनी कळविले आहे.