नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एनडीएतील मित्रपक्ष असलेल्या टीडीपी आणि जेडीयूने भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी पाठिंब्याचे पत्र सोपवले आहे. चंद्राबाबू नायुडू आणि नीतीश कुमार यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे नरेंद्र मोदी आणि भाजपला मोठा दिलासा मिळाला असणार हे नक्की आहे.काल लागलेल्या निकालात भाजपसह एनडीएला 293 जागा मिळाल्या आहेत. तर इंडिया आघाडीला 233 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे जर इंडिया आघाडीने साद घातली तर चंद्राबाबू आणि नीतीश कुमार त्यांचा इतिहास पाहता पलटी मारण्याची शक्यता नाकारता येत नाही.भाजपला 240 तर एनडीएला 293 जागा मिळाल्या आहेत. दुसरीकडे काँग्रेसला 99 तर इंडिया आघाडीला 234 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे बहुमतासाठी इंडिया आघाडीला लागणारी खासदारांची संख्या जास्त नाही. अशात इंडिया आघाडीकडूनही फोडाफोडीचे राजकारण होऊ शकते. हे टाळण्यासाठी भाजप सावध पाऊले उचलत आहे.
![](https://mymarathi.net/wp-content/uploads/2024/06/IMG_20240605_214701-1024x683.jpg)
![](https://mymarathi.net/wp-content/uploads/2024/06/IMG_20240605_215544-1024x683.jpg)