पुणे- गेल्या ४ डिसेंबरला येथील पारशी गार्डनमध्ये खून करून टाकलेल्या एकाचा मृतदेह आढळला आणि पुणे पोलिसांची तपासाची चक्रे फिरू लागली, अवघ्या १२ तासात या मर्डरची कहाणी बोपदेव घाटात उलगडली आणि दोन्ही खुन्यांना चतुर्भुज करण्यात आले . वाचा पोलिसी भाषेतच पोलिसी तपासाची सत्य कहाणी
गुन्हे शाखेकडुन खुनाच्या गुन्हयातील आरोपीतास १२ तासात केले जेरबंद
दिनांक ०४/१२/२०२३ रोजी कोंढवा पोलीस स्टेशनच्या हददीत शिवनेरीनगर येथील गव्हाणे क्रिडांगण समोर असलेले पारशी गार्डन, कोंढवा, पुणे येथे शाहनवाज उर्फ बबलु मुनिर सैय्यद याला कोणीतरी अज्ञात इराद्नेया त्याचे पोटावर व गळ्यावर कसल्यातरी धारदार हत्याराने वार करुन ठार मारले आहे. म्हणुन अज्ञात व्यक्ती विरुध्द कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे गुन्हा रजि. नं. १२२९/२०२३, भारतीय दंड संहिता कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्हयाचे घटनास्थळी युनिट-५, गुन्हे शाखेचे टिमने तात्काळ भेट देऊन, दाखल गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना, तपासादरम्यान युनिटकडील अधिकारी व स्टाफ यांना बातमी मिळाली की, शाहनवाज उर्फ बबलु याचा खुन झाला असुन, त्याचेसोबत शेवटचे साहिल युसूफ शेख, सद्दाम उर्फ सज्जुद्दीन शेख व त्याचा मित्र यांना पाहिलेले असुन, त्यांचेपैकी साहिल शेख व सद्दाम शेख यांचेकडे पांढ-या रंगाचा बर्गमन गाडी असुन ते बोपदेव घाटात लपुन बसलेले असल्याची बातमी मिळाली.
त्याप्रमाणे युनिटकडील पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी व स्टाफ असे बोपदेव घाटात जाऊन पाहणी
करत असताना १) साहिल युसूफ शेख, वय-२३ वर्षे, रा. बी-१, बंगलो सोसायटी, पिसोळी, पुणे व मुळगाव-मु.पो. बैरागड, ता.धार्णी, जि. अमरावती २) सज्जुद्दीन उर्फ सद्दाम सिरखुद्दिन शेख, वय-३५ वर्षे, रा. सायमा रेसीडेन्सी, शिवनेरीनगर, लेन नं.६, कोंढवा, पुणे यांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे केलेल्या कौशल्यपुर्ण व सखोल तपासात साहिल युसूफ शेख याने सुमारे दिड वर्षापुर्वी बबलु याचेकडुन पल्सर गाडी विकत घेतली. परंतु तो गाडीचे कागदपत्रे न देता वारंवार शिवीगाळ करीत होता. तसेच सज्जुद्दीन उर्फ सद्दाम सिरखुद्दिन शेख याने मयत शाहनवाज उर्फ बबलु याचेकडुन २ लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्याचेपेक्षा जास्त रक्कम घेऊन सुध्दा मयत वारंवार सद्दाम यास दमदाटी करुन शिवीगाळ करुन आणखी पैशाची मागणी करीत होता. साहिल, सद्दाम व त्यांचा मित्र नोमन खान, रा. पिसोळी असे तिघांनी मिळून मयताचे त्रासाला कंटाळुन त्याला जीवे ठार मारण्याचा कट रचुन, शाहनवाज उर्फ बबलु यास शिवनेरीनगर, पारसी मैदान येथे घेऊन जाऊन, त्यास दारु पाजुन, त्यांनी ठरल्याप्रमाणे शाहनवाज उर्फ बबलु धारदार हत्याराने त्याचे गळ्यावर वार करून, त्याचे पोटात चाकु खुपसून, त्यास गंभीर जखमी करुन जीवे ठार मारल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. नमुद आरोपी गुन्हा करतेवेळी व पळुन जाण्याकरीता वापरलेली १,१०,०००/- रु किची बर्गमन मोपेड जप्त करण्यात आली आहे. सदर खुनाच्या गंभीर गुन्हयाचा समांतर तपास करुन, सदरचा गुन्हा हा जलद गतीने व मोठया कुशलतेने हाताळुन अवघ्या १२ तासाच्या आत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, (अतिरिक्त कार्यभार) व मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त, श्री. अमोल झेंडे, मा. सहायक पोलीस आयुक्त, श्री. सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, श्री. महेश बोळकोटगी, सहा. पोलीस निरीक्षक, कृष्णा बाबर, पोलीस उप-निरीक्षक, अविनाश लोहोटे, पोलीस उप-निरीक्षक, वैताली गपाट, पोलीस अमंलदार, पृथ्वीराज पांडुळे, रमेश साबळे, राजस शेख, प्रताप गायकवाड, दया शेगर, प्रमोद टिळेकर, पल्लवी मोरे, विनोद शिवले, दाऊद सय्यद, अकबर शेख, अमित कांबळे, शहाजी काळे, शशिकांत नाळे यांनी केलेली आहे.