गायक-संगीतकार त्यागराज खाडिलकर यांना “स्व. अरुण पौडवाल कृतज्ञता गौरव पुरस्कार” प्रदान!

Date:

मुंबई : सुप्रसिद्ध अकॉर्डियन वादक, कुशल संगीत संयोजक आणि प्रतिभाशाली संगीतकार अरुण पौडवाल यांच्या स्मृती जपणारा आणि कुठलाही बडेजावपणा न आणता अत्यंत साधेपणाने घरगुती मंगलमय वातावरणात गेली २७ वर्षे साजरा होणारा ‘स्व. अरुण पौडवाल यांच्या स्मृति प्रित्यर्थ देण्यात येणारा “कृतज्ञता गौरव पुरस्कार” नुकताच प्रसिद्ध गायक संगीतकार त्यागराज खाडिलकर यांना सुप्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मश्री अनुराधाजी पौडवाल यांच्या हस्ते आणि कवीता पौडवाल-तुळपुळे व पौडवाल कुटुंबियांच्या उपस्थितीत, त्यांच्या खार येथील निवास्थानी प्रदान करण्यात आला. ५१ हजार रोख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

या गौरव सन्मानाची संकल्पना विशद करताना सुप्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल म्हणाल्या,  “अरुणजी हे स्वतः एक अतिशय उच्चकोटीचे संगीतकार – म्युझिशियन होते. त्यामुळे  कलाकारांचा योग्य तो सन्मान व्हायला पाहिजे. बहुतेकवेळा त्यांचे फॅन्स काही सत्कार सोहळे करीत असतात. पण आर्टिस्टने एका आर्टिस्टचा सन्मान करणे याला जास्त महत्व आहे. आजचा हा २७ वा सोहळा आहे. याच्या आधी ज्या ज्या कलाकारांनी अरुणजींसोबत काम केले आहे, ज्यांना त्यांच्या कामाची पद्धत, त्यांचा स्वभाव माहित आहे अश्या कलावंतांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी त्यागराज यांची निवड करण्यामागे विशेष कारण आहे. काही महिन्यापूर्वी मी त्यांच्या एका कार्यक्रमासाठी विशेष प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी दिव्यांग मुलांना घेऊन एक अल्बम केला होता. अश्या मुलांसोबत केलेला हा जगातील एकमेव असा सुंदर अल्बम आहे, असं मला वाटतंय. इतकं सुंदर संगीत आणि संयोजन करून त्यांनी पूर्ण न्याय दिला आहे. दुसऱ्या आर्टिस्टला पुढे आणावं ही गोष्ट, हि कल्पना फार महत्वाची आहे. त्यांच्यातील ही गोष्ट मनाला भिडली आणि म्हणूनच त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली.”

या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना गायक संगीतकार त्यागराज खाडिलकर म्हणाले, “माझ्यासाठी हा अत्यंत महत्वाचा पुरस्कार आहे. गेल्या २६ वर्षातील पुरस्कार्थींची यादी पाहिल्यावर खरंतर मी थरारून गेलो. अरुणजींच्या नावाचा हा पुरस्कार मिळविणाऱ्यांच्या या मांदियाळीमध्ये माझीही नोंद झाली हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. अरुणजींच्या संगीताचे आणि संगीतसंयोजनाचे अनेक संस्कार माझ्यावर झाले आहेत. माझ्या गाण्यांतून ते आपल्याला पदोपदी जाणवतात सुद्धा. या प्रतिभावान संगीतकाराची गाणी आजही तितक्याच लोकप्रियतेने गायली जातात. त्यांच्या नावाचा पुरस्कार लाभावा आणि तोही साक्षात पद्मश्री अनुराधाताई यांच्या हस्ते ही माझ्यासाठी विशेष भाग्याची आणि प्रेरणादाई गोष्ट आहे.

हा सोहळा अनुराधा पौडवाल यांच्या निवास्थानी स्थित दक्षिणेश्वरी काली माता मंदिरात संपन्न झाला. याच वेळी ‘स्वरकुल ट्रस्ट’तर्फे सादर झालेल्या “तिमीरातुनी तेजाकडे” या भारतातील पहिल्या दिव्यांग कलाकारांनी गायलेल्या अल्बम मधील अतुल कसबे आणि विजयालक्ष्मी यादव या दोन दिव्यांग गायकांना देखील अनुराधाजींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले! या अंध गायकांनी गायलेल्या महाराष्ट्रातील नवोदित गीतकरांच्या त्यागराजजींनी स्वरबद्ध केलेल्या रचनांना उपस्थितांचा भरभरून प्रतिसाद दिली!

याप्रसंगी त्यागराजजींनी दिव्यांग गायकांच्या हिंदी अलबमची, तसेच अनुराधा पौडवाल यांच्यासोबत ‘भजनगंगा’ या हिंदी कार्यक्रमाची योजना जाहीर केली. या कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन स्व. अरुण पौडवाल यांचे निस्सीम चाहते आणि जाणकार संगीतदर्दी प्रसिद्ध गायक श्री चंद्रशेखर महामुनी यांनी केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विशेष फुटपाथ दुरुस्ती अभियानाचे उद्घाटन

क्षेत्रीय कार्यालयांमध्ये 'जागल्या' संकल्पना राबविण्यात येणारपुणे- पुणे महानगरपालिका पथ...

श्री पूज्य गुरुदेवश्री राकेशजी यांच्या परिवर्तनकारी सत्संगाचे पुण्यात आयोजन…..

पुणे - श्रीमद् राजचंद्रजी यांचे भक्त,आध्यात्मिक मार्गदर्शक,आणि आत्मज्ञानी गुरु...

महिलाच्या आर्थिक सक्षमीकरणाला एआयची जोडमिळाल्यास त्यांचा शाश्वत विकास शक्य-विजया रहाटकर

‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट-2026’मध्ये महिला समृध्दीचा निर्धार नवी दिल्ली, दि....

महापौर मंजुषा नागपुरे, धीरज घाटे आणि दुष्यंत मोहोळ यांच्यावर गुन्हे दाखल का केले नाही? काँग्रेसचा सवाल

कॉंग्रेस भवनवर मोर्चा आणला त्यांनी ,चिथावणी देऊन आपल्या कार्यकर्त्यांना...