पुणे:छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके १५९६ म्हणजेच ६ जून १६७४ ला स्वतःस किल्ले रायगड येथे राज्याभिषेक करून घेतला आणि एका सार्वभौम राज्याच्या जयघोष केला. कित्येक वर्षे गुलामीत राहिलेल्या मराठी मुलुखात नवचैतन्याचा सोहळा पार पडला. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा भारताच्या इतिहासातील एक अत्यंत स्फूर्तिदायी प्रसंग. राज्याभिषेकाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती हे पद धारण केले. छत्रपती म्हणजे सार्वभौम आणि सर्वेसर्वा. राज्याच्या कारभारासाठी अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली आणि राज्याचा कारभार आणि पदे वाटून देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी महाराणी म्हणून सोयराबाई आणि युवराज म्हणून छत्रपती संभाजीराजे महाराजांचा ही अभिषेक करण्यात आला.
सालाबादप्रमाणे आखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या माध्यमातून लाल महालात दि.06 जून रोजी सकाळी 9.30 वाजता शिवराज्याभिषेकाचे आयोजन करण्यात आले आहे.
पूर्वसंध्येला दि.5 जून रोजी सायंकाळी सहा वाजता लाल महालात महिलांच्या वतीने किल्ले रायरेश्वर रायगड राजगड तोरणा शिवनेरी आणि देहू आणि आळंदी येथील तीर्थक्षेत्राच्या पाण्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला जलाभिषेक केला जाईल आणि त्यानं नंतर हस्ते दिपोस्तव आणि मशाल उत्सव करून छत्रपतींना मानवंदना देण्यात येईल
दिनांक 6 जून सकाळी ९.३० वाजता शिवराज्याभिषेक शाक्त पद्धतीने पार पडेल या राज्याभिषेकासाठी कोल्हापूर येथील महंत कैलास वडघुले आणि महिला महंत कुमारी स्वरा धुमाळ या राज्याभिषेकाचे पोराहित्य करतील
सामाजिक बांधिलकी म्हणून गरजू विद्यार्थ्यांना. मुलींना शिष्यवृत्ती देण्यात येणार असून छत्रपती शिवरायांचा पर्यावरण रक्षणाचा संदेश घरोघरी पोहोचविण्यासाठी उपस्थित सर्वांना झाडाचे रोप भेट म्हणून देण्यात येणार आहे
सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आखिल भारतीय शिव महोत्सव समितीचे अध्यक्ष विकास आण्णा पासलकर तसेच कार्याध्यक्ष प्रशांत धुमाळ, उपाध्यक्ष विराज तावरे सदस्य मंदार बहिरट निलेश इंगवले यांनी केले आहे.