पुणे:अकरावीच्या प्रवेशाची विद्यार्थ्यांना तसेच पालकांना चिंता लागलेली असते. त्यासंदर्भात सर्व माहिती व काही शंकांचे निरसन होण्यासाठी सुलभ पद्धतीने संवाद साधणार आहोत. यासाठी जे शिक्षक प्रत्यक्ष या प्रवेश समितीत कार्य करतात तेच शिक्षक प्रवेशाबाबत माहिती देतील. प्रवेशाबरोबरच १० / १२ वी नंतरचे करिअर गायडन्स याचीही सखोल माहिती दिली जाईल. त्याच बरोबर विद्यार्थी व पालकांच्या माहितीसाठी फर्ग्युसन कनिष्ठ महाविद्यालयात विविध विभागात कशा प्रकारे शिक्षण दिले जाते, कनिष्ठ महाविद्यालयामार्फत ऑलिम्पियाड सारख्या विविध परीक्षा घेतल्या जातात याचीही माहिती दिली जाईल. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे नीट, जेईई व एमएचटी – सीईटी या स्पर्धात्मक परीक्षांची तयारी कशी करावी व त्याची तत्सम माहिती महाविद्यालयातीलच शिक्षक देणार आहेत, यामुळे भविष्यातील शिक्षणाबाबत तसेच करिअर आणि अकरावी प्रवेशाबाबत आपला मार्ग मोकळा होईल यात शंका नाही. विद्यार्थी व पालकांच्या प्रश्नांवर उत्तरे शोधण्यासाठी आणि शंकांचे निरसन होण्यासाठी हे सेमिनार महत्वाचे ठरणार आहे. कार्यक्रमात सहभागी व्हावे ही सदिच्छा.
तारीख व वेळ : – रविवार दिनांक ० ९ .०६.२०२४
सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी
स्थळ : – अँफीथिएटर, फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे