भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार उपक्रम
पुणे ः
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत ‘ अंतरंग’ या कथक नृत्य सादरीकरण कार्यक्रमाचे आयोजन शनीवार,दि. ८ जून २०२४ रोजी करण्यात आले आहे. ज्येष्ठ नृत्यांगना आणि ‘ नृत्यधाम स्कूल ऑफ परफॉरमिंग आर्टस् ‘ च्या संचालिका प्रेरणा देशपांडे यांच्या शिष्या अवंती दातार आणि कल्याणी गोखले या एकल (सोलो) कथक नृत्य सादर करणार आहेत.कार्यक्रमात कथक नृत्याची पारंपारिक ताल प्रस्तुती व भावअंग सादर करण्यात येतील.
हा कार्यक्रम शनिवार, दि.८ जून २०२४ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे होणार आहे.हा कार्यक्रम विनामूल्य आहे.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा २१० वा कार्यक्रम आहे.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.