पुणे:वेबसीरीज तयार करण्याचे खोटे सांगून व पैसे गुंतविल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून महिलेची 60 हजार रुपयांची फसवणूककेली.
याप्रकरणी पिंपळे सौदागर येथील 59 वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार समीर उर्फ दीपक भटनागर (रा. वर्सोवा ,अंधेरी वेस्ट, मुंबई) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेला((Sangvi) वेबसीरीज तयार करण्याचे खोटे सांगितले. त्यासाठी पैसे गुंतविल्यास चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवले. त्यानंतर फिर्यादीने त्यांच्या आयसीआयसीआय बँकेच्या(Sangvi)खात्यातून आरोपीच्या नावाने असलेल्या बंधन बँकेच्या खात्यात 60 हजार रुपये ट्रान्सफर केले. मात्र, त्यानंतर आरोपीने वेबसिरीज तयार न करता व फिर्यादीला पैसे परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.