Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात हजेरी लावणार ऐका दाजीबा फेम ईशिता अरुण.

Date:

लोकप्रिय हास्यमालिकेचा मान पटकावणारी सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’! या वर्षीही ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होते आहे. या कार्यक्रमातून नेहमी नवनवीन गोष्टी प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. नवे पर्व, नवे विषय, नवनवीन प्रहसने यांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन होते आहेच. आता कार्यक्रमात येणार आहे ऐका दाजीबा फेम ईशिता अरुण. ईशिताने चक्क महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात प्रहसन साकारण्याचे धाडस केले आहे. समीर चौघुले आणि पृथ्वीक प्रताप या दोघांबरोबर ईशिता आपले प्रहसन सादर करणार आहे. आजवर तिच्या नृत्यामुळे ईशिताचा सगळीकडे नावलौकिक असल्यामुळे ती फार चर्चेत असते. पण आपली ही आवडती अभिनेत्री आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात प्रहसन करताना पाहायला मिळेल. प्रेक्षक नक्कीच पोट भरून हसण्यासाठी तयार असतील.

              ऐका दाजीबा गाण्यामुळे ईशिता अरुण ही दाजीबा गर्ल म्हणून सर्वत्र सुप्रसिद्ध झाली आहे. २२ वर्षांपूर्वी हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते आणि अजूनही हे गाणे आणि त्याचे संगीत आपल्याला ठेका धरण्यास भाग पाडते. पण या वीकएंडला ईशिता अरुण हिच्याबरोबर धमाल हास्यमैफील रंगणार आहे. समीर चौघुले आणि पृथ्वीक प्रताप यांच्याबरोबर ईशिता हे सादरीकरण  साकारणार आहे. अतिशय धमाल असे हे प्रहसन या वीकएंडला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ईशिता अरुण यांचा मराठीतला कॉमेडी  अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळेल. मराठीतल्या ठसकेदार कॉमेडीचा ईशिताचा अंदाज काही वेगळाच आहे. तेव्हा ही धमाल मस्ती आणि विशेष असा हा भाग येत्या शनिवारी आणि रविवारी रात्री ९ वाजता फक्त सोनी मराठी वाहिनीवर दिसणार आहे .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बारामतीची PDCC बँक रात्री 11 पर्यंत उघडी:माळेगाव कारखान्याच्या मतदारयाद्या आढळल्या, अजित पवारांचे PA, भरणेंचे सहकारी उपस्थित

पुणे-माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमुळे बारामतीचे राजकारण चांगलेच तापले...

ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेत्री लीला गांधी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

२४ ते २६ जून रंगणार बालगंधर्व रंगमंदिर वर्धापनदिन सोहळा पुणे...

कम ऑन किल मी.. आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे म्हणाले …. मरे हुए क्या मारना,मतदारांनीच तुमचा मुदडा पाडला

मुंबई: विधानसभा निवडणुकीतील कामगिरीची आकडेवारी सांगत उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे...