पुणे- मोहम्मद वाडी,हडपसर येथील अनाधिकृत Roof top Hotel च्या बांधकामावर वर पुणे महापालिकेने आज कारवाई करत हे बांधकाम उध्वस्त करून टाकले. या हॉटेलचा मालक चालक हे बांधकाम पाडल्यावर पुन्हा बांधकाम करून हॉटेल सुरु करतो असा अनुभव असल्याने महापालिका आता यावर फौजदारी गुन्हा दाखल करत आहे.
पुणे महापालिकेकडून एम आर टी पी १९६६ अनन्वे कलम ५३ नुसार संबंधित सर्वे नंबर 37,27 मोहम्मद वाडी हडपसर येथे
महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आली होती,नोटीस बजावली असता कुठलीही प्रतिक्रिया न दिल्याने आज सदरचे बांधकामांचे क्षेत्रफळ 4000चौरस फुट हॉटेल व पत्रा शेड एकूण 7600 चौ फुट अनाधिकृत बाधकाम पाडण्यात आले. हे बांधकाम पाडण्यासाठी महापालिकेकडून २ब्रेकर,2 जेसीबी,3 ग्रॅस कटर,८बिगारी , पोलिस वर्ग,समवेत कारवाई करण्यात आली,
या कारवाईसाठी पुणे महापालिकेकडून अधीक्षक अभियंता श्रीधर येवलेकर कार्यकारी अभियंता प्रविण शेंडे,
उप अभियंता हनुमान खलाटे,शाखा अभियंता संदीप धोत्रे , सागर सकपाळ, ऋतुजा चीलकेवार टूलीप engg
यांच्या उपस्थितीमध्ये हि कारवाई करण्यात आली. तसेच या हॉटेलच्या बांध कामावर या पुर्वी देखील दोन वेळा करवाई करण्यात आली होती. व एमआरटीपी कलम 52 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.