पुणे : श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च येथे मॅजिक बस इंडिया फाउंडेशन तर्फे ७ दिवसीय एम्प्लॉयबिलिटी स्किल्स एन्हांसमेंट इनिशिएटिव्ह – वर्क सर्टिफिकेशन प्रोग्रामचे आयोजन अरण्येश्वर कॅम्पसमध्ये करण्यात आले होते. शिबिरासोबतच जॉब फेअरचे आयोजन देखील करण्यात आले होते.
संस्थेचे मानद सचिव अण्णा थोरात, मानद सहसचिव विकास गोगावले, खजिनदार जगदीश जेथे, कारभारी मंडळ अध्यक्ष सुरेश देसाई, नियामक मंडळ अध्यक्ष सत्येंद्र कांचन यांनी शिबिरासाठी मार्गदर्शन केले. समन्वयक म्हणून डॉ. प्राजक्ता वराळे यांनी विशेष प्रयत्न केले. सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी या शिबिरासाठी सहकार्य केले.
या जॉब फेअर मध्ये पुण्यामधील पाच नामांकित कंपन्यांचे एचआर मॅनेजर सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या मुलाखती व ट्रेनिंग प्लेसमेंट उपक्रम आयोजित करण्यात आले होते. यामध्ये मॅक्स न्यूयॉर्क इन्शुरन्स , टेक व्ह्यू वेब सोल्युशन, मारुती सुझुकी, इम्परेटिव्ह बिझनेस वेंचर्स व एफ पी एल या कंपन्यातर्फे नोकरीसाठी मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महाविद्यालयातील एकूण ६० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला व मुलाखत प्रक्रिया यशस्वीरित्या पार केली.
एम्प्लॉयबिलिटी स्किल्स एन्हांसमेंट इनिशिएटिव्ह – वर्क सर्टिफिकेशन प्रोग्राम कार्यशाळा संपन्न
Date: