कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टचे १२७ वे वर्ष ; कार्यकारी विश्वस्तपदी ॲड. प्रताप परदेशी
पुणे : कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या २०२४-२५ या मंदिराच्या १२७ व्या वर्षाकरीता राजेंद्र बलकवडे यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. तर कार्यकारी विश्वस्तपदी ॲड. प्रताप परदेशी, खजिनदारपदी ॲड. रजनी उकरंडे, उत्सवप्रमुख सुनिल रुकारी आणि उप उत्सवप्रमुख म्हणून अक्षय हलवाई यांची नियुक्ती झाली आहे.
राजेंद्र बलकवडे यांनी यापूर्वी ट्रस्टवर खजिनदार म्हणून काम पाहिले आहे. सामाजिक चळवळीत ते अग्रेसर आहेत. अनेक क्रीडा संस्था, गणेशोत्सव मंडळांसह सामाजिक संस्थांवर देखील ते कार्यरत आहेत.
यासोबतच ट्रस्टचे नवनियुक्त कार्यकरी विश्वस्त ॲड. प्रताप परदेशी हे ज्येष्ठ विधीज्ञ असून पुणे बार असोसिएशनवर त्यांनी काम केले आहे. ॲड. रजनी उकरंडे या धर्मादाय कार्यालयात वकील म्हणून कार्यरत आहेत. नवनियुक्त विश्वस्त मंडळात ट्रस्टच्या विश्वस्तपदी युवराज गाडवे, डॉ. पराग काळकर, अॅड.शिवराज कदम जहागिरदार, महेंद्र पिसाळ यांची नियुक्ती करण्यात आली.
कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी राजेंद्र बलकवडे
Date: