ड्रायव्हरच्या तक्रारीवरून आज पहाटे पावणेदोन वाजता गुन्हा दाखल
पुणे-पुणे हिट अँड रनप्रकरणी कार अपघातातील अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. अपघातानंतर आरोपीसोबत असलेल्या ड्रायव्हरला डांबून ठेवल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास शुक्रवारी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. यानंतर लगेच आर्थिक गुन्हे शाखेकडून कारवाई करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.काल शुक्रवारी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे हा तपास वर्ग करण्यात आला होता. यानंतर तपासाला वेग आला. शुक्रवारी रात्रीच सुरेंद्र अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. पोर्शे कारच्या चालकाला जबाब देण्यासाठी धमकी दिल्याप्रकरणी आणि त्याला डांबून ठेवल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.आज शनिवारीच त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे
चालक गंगाधर शिवराज हेरीक्रुब वय 42 वर्ष यांनी फिर्याद दिली की, दिनांक 19/05/2024 रोजी रात्रौ ते दिनांक 20/05/2024 रोजी दरम्यान येरवडा पोलीस स्टेशन येथुन मी माझे घरी जात असताना सुरेंद्र आगरवाल सरांनी मला येरवडा पोलीस स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर त्यांनी मला त्याचेकडे बोलावुन घेवुन धमकी देवुन माझ्या इच्छेविरुध्द त्यांचेकडील बीएमडब्ल्यु गाडीमध्ये बसवुन, ब्राम्हा सनसिटी येथील त्यांचे बंगल्यात आणुन, सुरेंद्र आगरवाल सर व विशाल आगरवाल सर यांनी आपआपसात संगणमत करुन मला धमकावुन माझा मोबाईल फोन काढुन घेवुन त्यांच्या बंगल्यामध्ये बेकायदेशीर लपवुन ठेवण्याच्या उददेशाने डांबुन ठेवून धमकाविले कीं त्यांच्या मुलाने केलेला गुन्हा स्वतः वर घे व “ त्या बाबतीत कोणाशी बोललास तर याद राख ”अशी धमकी दिल्यावरून भा.दं.वि.कलम 342, 365, 368, 506, 34. नुसार येरवडा पोलीस ठाण्यात आज पहाटे पावणेदोन वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.