बक्कळ कमाईसाठी तरुणाईला वेगळ्या मार्गावर नेणाऱ्या पबवाल्यांकडून आमिषे दाखवून आंदोलन-
पुणे- कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला मिळालेला जामीन आणि एकूण पुण्यातील अपघात प्रकरण यामुळे पुणे पोलीसांची प्रतिमा मलीन झाली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था कायम राखली जावी. याकरीता तातडीने पुणे शहर पोलीस आयुक्तांची बदली करण्याची मागणी पुणे शहर उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीबाबत शिवसेनेचे संजय मोरे म्हणाले की, कल्याणीनगर हिट अँड रनचा गुन्हा घडल्यानंतर स्थानिक आमदाराच्या हस्तक्षेपामुळे अल्पवयीन आरोपी मुलाच्या रक्त चाचणीला काही काळ उशिर झाला आहे. याशिवाय एकूण राज्यपातळीवरील अनेक नेत्यांनी यानिमित्ताने पुण्यातील कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या पोलीसांवर दबाब टाकण्याचे काम केले आहे. केंद्रातील एका मोठा नेता तर यानिमित्ताने गरीब आणि श्रीमंत अशी दरी तयार करीत आहे. त्यात श्रीमंतांनी गरीबांना गाडीने उडविले तरी त्यांना गुन्ह्यातून सवलत अशी पध्दत विकसित करण्याचे काम केले आहे. पुण्यातील या घटनेची नोंद केंद्र पातळीवर घेण्यात आली आहे. त्यामुळे पुणे शहराची असलेली सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणात माहेरघर अशी चांगली ओळख पुसवून याठिकाणी चुकीची संस्कृती विकसित करण्याचे काम होणार असेल तर आम्ही ते सहन करणार नाही.राजा बहादुर मिल परिसरात जे पब चालतात त्याठिकाणी पबचालकांनी आंदोलन केले. ड्रिंक, हिट अँड रन घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने यांच्या परवान्याबाबत कारवाई केली आहे. म्हणून पबवाल्यांनी आज युवकांना सोबत घेउन आंदोलन केले आहे. पुन्हा पुन्हा यांच्या व्यवसायासाठी लहान मोठ्या मुलांचा वापर केला जात आहे. अनधिकृत व्यवसायासाठी याप्रकारे आंदोलन करण्यासाठी पोलीसांकडून परवानगी का दिली गेली ? सदर आंदोलनामधे मुलांचा वापर केल्याबाबत या पब चालकांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. मद्य व अमली पदार्थांसाठी अल्पवयीन मुलांना पबचालकांकडून अगोदरच प्रोत्साहित करून गिऱ्हाईक बनवले गेले आहे. त्यामुळेच मुलांच्या आयुष्याची राखरांगोळी झाली. आणि आता पुन्हा पब चालकांवर व मालकांनी प्रशासन व सरकार विरोधात आंदोलन करण्यासाठी मुलांचा वापर केला. याबाबत पब मालकांना कडक शासन झालेच पाहिजे. अन्यथा या पबवाल्यांना पोलीसांची साथ असल्याबाबत शिक्कामोर्तब होईल. आणि म्हणूनच पोलीस आयुक्तांची बदली क्रमप्राप्त ठरते.