Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

प्रवरा नदीत SDRF ची बोट उलटली:2 तरुणांचा शोध घेताना 3 जवानांचा बुडून मृत्यू

Date:

अकोले-प्रवरा नदित राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची बोट उलटल्याची घटना घडली आहे. प्रवरा नदीत बुडालेल्या 2 तरुणांचा शोध घेण्यासाठी ही बोट गेली होती. या दुर्घटनेत एसडीआरएफ पथकातील तिघांचा मृत्यू झाला असून दोघांचा शोध सुरू आहे. प्रवरा नदीत बुधवारी दोन तरुण बुडाले असल्याची माहिती मिळाली होती. त्यापैकी एका तरुणाचा मृतदेह आढळून आला तर दुसऱ्या तरुणाचा शोध सुरू होता. या दरम्यान SDRF चीच बोट उलटली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बुधवारी प्रवरा नदीत दोन तरुण बुडाल्याची घटना घडली होती. यांपैकी एका तरुणाचा मृतदेह सापडला होता तर दुसऱ्या तरुणाचा शोध सुरू होता. याच शोधकार्यासाठी आज एसडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते. अकोले तालुक्यातील सुगाव गावजवळ ही शोधमोहिम सुरू होती. शोध घेण्यासाठी बोटीत पथकातील चार जणांसह एक स्थानिक तरुण बसला होता.दरम्यान, पाण्याच्या प्रवाहामुळे पथकाची बोट उलटली. या दुर्घटनेत एसडीआरएफ पथकातील तिघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर इतर दोघांचा शोध सुरू आहे. प्रांताधिकारी शैलेश कुमार हिंगे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. सध्या बोटीमधील इतर दोघांचा शोध सुरू आहे. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सरन्याधीश भूषण गवईंचा प्रोटोकॉल न पाळून भाजपा युती सरकारकडून अपमान, आंबेडकरी विचारांचे असल्याने अपमान केला का? : नाना पटोले

सरन्यायाधिशांचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर राज्य सरकार काय कारवाई करणार. राज्य...

पॉलिटेक्निक प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया २० मे पासून सुरू

पदविका अभ्यासक्रम नोकरी व उद्योगासाठी उपयुक्त पर्याय; अधिकाधिक विद्यार्थ्यांनी...