पुणे, 21 मे, 2024: दुचाकी आणि तीनचाकी विभागात कार्यरत वाहन निर्माता कंपनी टीवीएस मोटर कंपनी (टीवीएसएम) – आज टीवीएस अपाचे 160 सिरीज मोटारसायकलचे ‘ए ब्लेझ ऑफ ब्लॅक’ डार्क एडिशन महाराष्ट्रात लॉन्च केले आहे. टीवीएस अपाचे आरटीआर 160 आणि आरटीआर 160 4वी अशा या बाईक्स आहेत. अपाचे आरटीआर 160 4वी ही भारतातील सर्वात शक्तिशाली 160cc ऑइल कूल्ड मोटरसायकल आहे जी 17.6 पीएस@9250 पॉवर देते. या दोन्ही मोटारसायकलमध्ये तीन राइड मोड, डिजिटल एलसीडी क्लस्टर, एलईडी हेडलॅम्प, टेललॅम्प आणि GTT यासह सर्वोत्कृष्ट-इन-सेगमेंट कामगिरी आदी वैशिष्ट्ये आहेत. सेगमेंट फर्स्ट राइड मोड्स हे इंजिन आणि एबीएस मोडचे संयोजन आहेत जे 3 मोड देतात – स्पोर्ट, अर्बन आणि रेन जे वेगवेगळ्या राइडिंग वातावरणासाठी तयार केलेले आहेत.
60 हून अधिक देशांमध्ये टीवीएस चा चांगलाच विस्तार आहे. यामुळेच टीवीएस अपाचे हा जगातील सर्वात वेगाने वाढणारा स्पोर्ट्स मोटरसायकल ब्रँड बनला आहे. रेसिंग डीएनए समोर ठेवून तयार करण्यात आलेली टीवीएस ची ही मालिका तिच्या लूक्सपासूनच स्वतःचे वेगळेपण जपते आणि सिद्ध करते. तिची कामगिरी, डिझाइन, तंत्रज्ञानापासून ते त्याच्या रचनेपर्यंत सारेच अनोखे आहे. यात रायडरची सुरक्षितता आणि आराम यावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. ट्रॅक टू रोड तत्त्वज्ञानाभोवती तयार आणि विकसित केलेल्या, टीवीएस अपाचे मालिकेमुळे रेसिंगमध्ये सर्वांना सहभागी होण्यास मदत केली आहे. तिच्या या वैशिष्ट्यामुळेच टीवीएस अपाचे आता केवळ उत्पादन राहिलेले नाही तर ग्राहकांसाठी तो एक महत्त्वाकांक्षी मोटरसायकल ब्रँड झाला आहे.
या नवीन सिरीजच्या लाँच प्रसंगी टीव्हीएस मोटर कंपनीचे प्रीमियम बिझनेस – हेड विमल सुंबली म्हणाले, “टीवीएस ला चार दशकांहून अधिक काळाची समृद्ध रेसिंग परंपरा आहे. जगभरातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रीमियम मोटरसायकल ब्रँडपैकी एक असलेल्या टीवीएस अपाचे ला 5.5 दशलक्षाहून अधिक ग्राहकांचे प्रेम मिळाले आहे. कामगिरीमध्ये सातत्य ठेवणारी टीवीएस अपाचे मालिका ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा दाखला आहे. आता, टीवीएस अपाचे आरटीआर 160 सिरीजची नवीन आकर्षक ब्लॅक एडिशन ग्राहकांना अधिक आकर्षक वाटते आहे. तसेच तिचा स्पोर्टियर लुकही ग्राहकांना आकर्षित करतो आहे.”
ब्लॅक एडिशन – टीवीएस अपाचे आरटीआर 160 सिरीज महाराष्ट्रात या किमतींमध्ये उपलब्ध होईल –
• टीवीएस अपाचे आरटीआर 160 साठी रु.1,09,990 (एक्स-शोरूम महाराष्ट्र)
• टीवीएस अपाचे आरटीआर 160 4वी साठी रु.1,19,990 (एक्स-शोरूम महाराष्ट्र)