पुणे, दिः२१ मेः अलार्ड चॅरिटेबल ट्रस्टच्या हिंजवडीच्या मारुंजी येथील अलार्ड पब्लिक स्कूल च्या (सी.बी.एस.ई) दहावी आणि बारावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. विद्यालयाने आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. दहावीच्या परीक्षेत धीमण सिंग ९४.०० प्रथम क्रमांक, गिरीजा अडसूळ ८७.४ द्वितीय क्रमांक आणि अर्णव झा ८६.२ तृतीय क्रमांक मिळविला आहे.
बारावीच्या परीक्षेत अद्विका बदकश ९६.६ टक्के प्रथम क्रमांक, अभिजित प्रसाद ९५.२ द्वितिय क्रमांक, शाश्वती शर्मा ९२.८ टक्के तृतिय क्रमांक, सिद्धेश माचवे ९२.४ टक्के चतुर्थ क्रमांक, हर्षिनी डेरे ९२.२ टक्के पाचवा क्रमांक आणि आर्या अग्रवाल ९०.८ टक्के, ऋतविक शर्मा ९०.२ टक्के संपादन केले आहे. तसेच, एकूण ३९ विद्यार्थ्यांपैकी ६ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण संपादन केले आहे.
या स्कूलच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार अलार्ड चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एल.आर.यादव, अलार्ड स्कूलच्या संचालिका ज्योत्स्ना मिश्रा आणि प्रिन्सिपल शुभ्रा श्रीवास्तव यांनी केला. या प्रसंगी डॉ. एल.आर.यादव म्हणाले, अलार्ड पब्लिक स्कूलने यशाची १० वर्षे साजरी केली आहेत. विद्यार्थी आणि शिक्षकांच्या कठोर परिश्रम आणि प्रतिभेमुळे स्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे.
