Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पहाटे२:३० वाजता- एअरपोर्टरोडवर नंबर प्लेट नसलेल्या एका आलिशान कारची धडक,दुचाकीवरील तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू

Date:

गर्भश्रीमंत बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने घेतले बळी बिल्डर पालकावर गुन्हा अद्याप दाखल नाही आणि कार विक्री करणाऱ्या डीलर वर हि कारवाई नाही

पुणे-पुण्यातील एका गर्भश्रीमंत बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगातील नव्या कारने धडक दिल्यामुळे दुचाकीवरून जाणाऱ्या दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये एका तरुणीसह तरुणाचा समावेश आहे. हा अपघात शनिवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास कल्याणीनगर येथे घडला. गर्भ श्रीमंत बिल्डरच्या अल्पवयीने मुलाने अत्यंत बेदरकारपणे त्याची विना नंबर प्लेट ची आलिशान गाडी चालवीत रस्त्यावरील वाहनांना धडक दिली. 

याप्रकरणी या मुलावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो पुणे शहरातील बड्या बिल्डरचा मुलगा असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत अकिब रमजान मुल्ला याने फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण आणि त्याचे मित्र कल्याणीनगर परिसरातील ‘बॉलर’मध्ये पार्टी करुन घरी जात होते. त्यावेळी कल्याणीनगर एअरपोर्ट रोडवर नंबर प्लेट नसलेल्या एका आलिशान कारने दुचाकीला जोरात धडक दिली.

ही धडक एवढी जोरात होती की, दुचाकी वरील अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा दूरवर फेकले गेले. रस्त्यावर जोरात आपटल्याने गंभीर जखमी होऊन त्याचा जांगीच मृत्यू झाला. अपघातानंतर आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु काही नागरिकांनी त्याला आडवून बाहेर काढून चोप दिला. पुढील तपास येरवडा पोलीस करीत आहेत.

बारावी उत्तीर्ण झाल्याने Q Bar & Cafe मध्येही या अल्पवयीन आरोपीने केली होती पार्टी

कल्याणीनगर येथे रविवारी पहाटे अडीच वाजता घडलेल्या आपघाताच्या आधी आरोपी अल्पवयीन मुलाने त्याच्या मित्रांसह कोरेगाव पार्कच्या ‘क्यू बार अँड कॅफे’ (Q Bar & Cafe) मध्ये पार्टी केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. यावेळी त्याच्यासोबत त्याचे आणखी दोन मित्र होते. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत त्यांचा ड्रायव्हर देखील होता. मात्र, अल्पवयीन मुलाने जबरदस्तीने गाडी स्वत:कडे चालविण्यास घेतली आणि अपघात घडला. विशेष म्हणजे हा मुलगा अल्पवयीन असतानाही त्याला बारमध्ये प्रवेश कसा देण्यात आला हा प्रश्न उपस्थित झाला आहे.आरोपी मुलगा हा दोन दिवसांपूर्वी बारावी उत्तीर्ण झाला आहे. तो सीबीएससी बोर्डात शिकतो. बारावी उत्तीर्ण झाल्याने त्याने मित्रांसह पार्टी करण्याचे ठरवले. त्याकरिता दोन मित्रांना घेऊन तो कोरेगाव पार्कमधील ‘क्यू बार अँड कॅफे’मध्ये गेला.

वडिलांनी घेऊन दिली पावणेदोन कोटींची गाडी- आरटीओ रजिस्ट्रेशन न करताच गाडी घेऊन पार्टी

.पोलिसांच्या माहितीनुसार, त्याच्या वडिलांनी तब्बल पावणेदोन कोटींची नवीनच पोर्शे ही नवीनच गाडी खरेदी केली होती. या गाडीचे अद्याप आरटीओ रजिस्ट्रेशनच झालेले नाही. त्यामुळे या गाडीला नंबरच मिळालेला नाही. विना नंबर प्लेटची ही गाडी घेऊन हे तरुण बारमध्ये गेले. त्यावेळी त्यांनी ड्रायव्हर सोंबत घेतलेला होता. मात्र, पार्टीवरून घराकडे परत येत असताना त्याने ड्रायव्हरला बाजूला करून स्वत: ही गाडी चालवण्यास घेतली. त्यानंतर, त्याने रस्त्यावरून ही गाडी बेफाम चालविण्यास सुरुवात केली. दरम्यान, अनिस, अश्विनी, फिर्यादी अकीब व त्यांचे मित्र कल्याणीनगर येथील बॉलर हॉटेलमध्ये पार्टी करण्यासाठी गेलेले होते. पार्टी संपल्यानंतर ते सर्वजण घरी परत जात होते. पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास कल्याणीनगर येथील लॅन्डमार्क सोसायटी जवळ ते आले. कल्याणीनगर-एअरपोर्ट रोडवर त्यांच्या पाठीमागून ग्रे कलरची पोर्शे कार भरधाव आली. ही कार चालवीत असताना आरोपीचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्याने अनिस आणि अश्विनी जात असलेल्या मोटार सायकलला जोरात धडक दिली. यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.याप्रकरणाचा पुढील तपास सहायक निरीक्षक विश्वनाथ तोडकरी करीत आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या चऱ्होली आणि माण ई- बस डेपोचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

नागरिकांना उत्तम वाहतूक सेवा देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील -उपमुख्यमंत्री...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्तेदापोडी पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन

पुणे, दि. 25: पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील दापोडी...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बावधन पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे लोकार्पण

पुणे, दि.२५: उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या...