तमन्ना भाटिया आणि राशि खन्ना स्टारर तामिळ चित्रपट ‘अरनमानाई 4’ ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आणि आता हा चित्रपट हिंदीत रिलीज होणार आहे. तमन्ना भाटिया आणि राशी खन्ना यांचे चाहते 24 मे पासून त्यांच्या जवळच्या चित्रपटगृहात हिंदीतील हॉरर-कॉमेडीचा आनंद घेऊ शकतात. तमिळ आवृत्तीला प्रेक्षकांसोबतच समीक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
बॉक्स ऑफिसवर याने 70 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे आणि लवकरच 100 कोटींचा टप्पा गाठणार आहे. ‘अरनमानाई 4’ ही तमन्ना आणि राशी यांच्या अभिनयाची जादू दिसली आहे जी आता हिंदी प्रेक्षकांना सुद्धा अनुभवयाला मिळणार आहे. तमन्ना आणि राशीच्या चाहत्यांनी हॉरर-कॉमेडीमधील त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले आणि त्यांच्याकडून आणखी प्रोजेक्ट्स पाहण्यास उत्सुक आहेत. त्यांच्या ‘अच्छाचो’ गाण्यालाही प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाले आणि ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाले. तमन्ना आणि राशी व्यतिरिक्त, चित्रपटात सुंदर सी मुख्य भूमिकेत असून त्यात रामचंद्र राजू, संतोष प्रताप, कोवई सरला, योगी बाबू, व्हीटीव्ही गणेश, दिल्ली गणेश आणि के एस रविकुमार यांचा समावेश होता.