हे आंदोलन म्हणजे निव्वळ राजकीय स्टंटबाजी -पोलिसांचा दावा
पुणे-रवींद्र धंगेकर यांनी पुण्याच्या सहकार नगर परिसरात भाजपने पैसे वाटल्याचा आरोप करत याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी करत . या प्रकरणी त्यांनी मतदानाच्या पूर्वसंध्येला म्हणजे रविवारी सायंकाळी सहकारनगर पोलिस ठाण्यापुढे आपल्या सहकाऱ्यांसोबत ठिय्या आंदोलन केले होते.पोलिसांनी त्यांची मागणी व आंदोलन म्हणजे राजकीय स्टंट बाजी ठरवून या प्रकरणी पोलिसांनी मंगळवारी रवींद्र धंगेकर यांच्यासह त्यांच्या 100 ते 150 कार्यकर्त्यांवर भादंवि कलम 143, 147, 149 अंतर्गत तथा महाराष्ट्र पाेलिस अधिनियम कलम 135 व लाेकप्रतिनिधी अधिनियमचे कलम 126 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे .
रवींद्र धंगेकर यांच्या आंदोलनामुळे पुण्याचे वातावरण चांगलेच तापले होते. त्यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यापुढे जोरदार घोषणाबाजी केली होती.रवींद्र धंगेकरांनी केवळ पैसे वाटल्याचा आरोप करत विरोधी पक्षातील काहीजणांवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यांच्या या भूमिकेमुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी धंगेकरांची विनवणी केली. तसेच अशाप्रकारे कारवाई करता येणार नाही असे त्यांना सांगितले.
त्यातच भाजपचे आमदार माधुरी मिसाळ व पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पाेलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन धंगेकरांवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यांनी तसे निवेदनही सादर केले. पर्वती परिसरात धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांवर रवींद्र धंगेकर यांच्या नावाने साड्या वाटप करणे, बेकायदा फलक लावण्याचा, आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. त्यामुळे ते भाजपवर असे आरोप करत असल्याची बाब घाटे यांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. अखेर याबाबत पाेलिसांनी सहकारनगर पाेलिस स्टेशन येथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेईल, तसेच आचारसंहितेचा भंग केला म्हणून गुन्हा दाखल केला आहे.