Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

सूत्रधारांना पकडण्यासाठी लढाई आम्ही सुरूच ठेवणार, उच्च न्यायालयात दाद मागू – हमीद दाभोलकर

Date:

पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून करणाऱ्या सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना येथील विशेष न्यायालयाने जन्मठेप आणि प्रत्येकी पाच लाख रुपयांची शिक्षा सुनावली आहे.तर डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. विशेष न्यायाधीश पी.पी. जाधव यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल सुनावला. तब्बल अकरा वर्षांनी खटल्याचा निकाल लागला. या निकालावर हमीद दाभोलकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.सूत्रधारांना पकडण्यासाठी ही लढाई आम्ही सुरूच ठेवणार, हा लढा असाच सुरु राहणार असून आम्ही उच्च न्यायालयात दाद मागू असे त्यांनी सांगितले आहे.

हमीद दाभोलकर म्हणाले, आम्ही उच्च न्यायालयात दाद मागू. डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या खून खटल्याचे सूत्रधार पकडले गेले नाहीत याची खंत आहे. पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश, डॉ नरेंद्र दाभोलकर खून या घटनांमधून हा व्यापक कटाचा भाग आहे हे आम्ही नव्हे तर सीबीआय, एटीएस, महाराष्ट्र एसआयटी, कर्नाटक एसआयटी वेगवेगळ्या तपास यंत्रणांनी हे वारंवार सांगितले आहे. बहुतांश वेळेला व्यापक कटातील सूत्रधार मोकळे सुटतात आणि प्यादी यांना बळीचा बकरा बनविले जाते. त्यामुळे सूत्रधारांना पकडण्यासाठी ही लढाई आम्ही सुरूच ठेवणार आहोत. या खुनाच्या तपास आणि खटल्याला ११ वर्षे लागली आहेत. आमची सुरुवातीपासून हीच भूमिका होती की काही लढाया आपली जबाबदारी म्हणून लढायच्या असतात. हार जीतच्या पलीकडे व्यापक प्रश्न पणाला लागलेले असतात. न्याय व्यवस्थेवरील विश्वास, सामाजिक कार्यकर्त्यांची हत्या, विचार संपविण्यासाठी माणसाला संपविणे या प्रवृत्तीच्या विरोधातील हा लढा होता. जोपर्यंत ही प्रवृत्ती आहे तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

निकालात सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनी गोळीबार केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्या विरोधातील सक्षम पुरावे पोलिसांनी न्यायालयात सादर केले. त्या आधारे दोघांना शिक्षा सुनावण्यात येत आहे, असे न्यायाधीश जाधव यांनी निकालात नमूद केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सरन्याधीश भूषण गवईंचा प्रोटोकॉल न पाळून भाजपा युती सरकारकडून अपमान, आंबेडकरी विचारांचे असल्याने अपमान केला का? : नाना पटोले

सरन्यायाधिशांचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर राज्य सरकार काय कारवाई करणार. राज्य...

पॉलिटेक्निक प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया २० मे पासून सुरू

पदविका अभ्यासक्रम नोकरी व उद्योगासाठी उपयुक्त पर्याय; अधिकाधिक विद्यार्थ्यांनी...