आंबेडकरी जनता आघाडीच्या पाठीमागे उभी राहिल

Date:

– नेत्यांपेक्षा संविधान वाचवणे महत्वाचे– टेक्सास गायकवाड यांचे मत

पुणे

वंचितमुळे मागील निवडणुकीत भाजपला ताकत मिळाली, हे आंबेडकरी जनतेला समजले आहे. त्यामुळे आंबेडकरी जनता व अनुयायी वंचितच्या सभांना गर्दी करतील. मात्र, देशाचे संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी आंबेडकरी जनता महाविकास आघाडीच्या पाठीमागे उभी राहिल आणि आघाडीच्याच उमेदवारांना मतदान करतील, असा विश्वास आंबेडकरी चळवळीतील संघर्षशील नेतृत्व, प्रबुद्ध साहित्यिक, भीमपुत्र, भारतीय रक्षक आघाडी प्रमुख टेक्सास गायकवाड यांनी व्यक्त केला.

पुणे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ शनिवारी काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत टेक्सास गायकवाड बोलत होते. यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष व लोकसभा निवडणूक प्रचारप्रमुख मोहन जोशी, सरचिटणीस अजित दरेकर, सरचिटणीस वीरेंद्र किराड,संजय बालगुडे,राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी, प्रशांत सुरसे, राज अंबिके आदि उपस्थित होते.

गायकवाड म्हणाले, आज देश आणि देशाचे संविधान धोक्यात आहे, अशा वेळी कट्टर आंबेडकरवादी शांत बसत नाही. त्यामुळे मी भारतीय रक्षक आघाडीचा महाविकास आघाडीला पाठिंबा देण्यासाठी आलोय. मोदी यांच्या हाती देण्याची सत्ता गेली, आता हा माणूसदेशाचे वाटोळे करणार, हे मी ओळखले होते, त्यामुळे मी मोदींचीसत्ता आल्यावर 2014 मध्येच काळा दिवस साजरा केला. भारताचे हिटलर मोदी आहेत, तर अमित शहा गोबेल्स आहेत. या दोघांनी कोट्यावधी रुपये खर्च करून राहुल गांधींना पप्पू पप्पू म्हणून बदनाम केले. मोदी यांच्या कारभारामुळे देश अडचणीत आहे. त्यामुळे मोदी शहांना या निवडणुकीत मतदारांनी घडा शिकवला पाहिजे. आजचा काळ पक्ष वाचवण्याचा नाही तर संविधान वाचवण्याचा आहे. दहा वर्षानंतर भाजपने राहुल गांधी यांचे महत्व ओळखले. आज ते म्हणत आहेत, ही लढाई गावकी भावकीची नाही तर मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे.

आंबेडकरी जनतेने केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, अ‍ॅड प्रकाश आंबेडकर, बेहेन  मायावती यांचा बहुमान राखावा. मात्र त्यासोबतच संविधानाचाही विचार करावा. नेत्यांच्या मनापेक्षा संविधान व बाबासाहेबांचा मान महत्वाचा आहे. मागील लोकसभा निवडणुकीमध्ये वंचितमुळे भाजपला मदत झाली. हे आंबेडकरी जनतेला कळाले आहे. रामदास आठवले हे जातीयवादी व मनुवादी पक्षासोबत असल्याचेही आंबेडकरी जनतेला पटत नाही. त्यामुळे आंबेडकरी जनता प्रकाश आंबेडकर आणि आठवलेंच्या सभांना जातील. मात्र, पक्षाचा अभिनिवेष बाजूला ठेवून संविधान वाचवण्यासाठी महाविकास आघाडीला मतदान करेल.

आंबेडकरी विचाराच्या पक्षांनी आपला पक्ष ग्रामपंचायत, पंचायत समिती इथपासून वाढवण्यास सुरूवात करावी. मात्र, लोकसभेला जातीयवादी व संविधान संपवणार्‍या शक्तीला रोखण्यासाठी आता महाविकास आघाडीला साथ द्यावी. राहुल गांधींना आंबेडकरी जनतेने समजून घेतले पाहिजे, असेही टेक्सास गायकवाड म्हणाले.

प्रारंभी राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी प्रास्ताविक केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अरण्येश्वर प्रभात शाखेच्या क्रीडा स्पर्धांचा गुरुवारी शुभारंभ

पुणे - रा.स्व. संघाच्या सहकारनगर भागातील अरण्येश्वर प्रभात शाखेतर्फे...

सर्व धर्मीय ख्रिसमस स्नेह मेळावा संपन्न

पुणे; पुण्यातील येरवडा – शास्त्रीनगर भागातील सेक्रेड हार्ट चर्च येथे...

पुरंदर विमानतळामुळे पुणे परिसरातील औद्योगिक विकासाला प्रोत्साहन-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

• पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी जास्तीत जास्त दर देण्याचा विचार•...

राज बब्बर,रमेश बागवे, मोहन जोशी,वसंत पुरकेंसह काँग्रेसच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर.

मुंबई, दि. २३ डिसेंबर २०२५ राज्यातील २९ महानगरापालिकांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस...