पुणे- (Pune Lok Sabha Election 2024)मनसे सोडून वंचित मधून वसंत मोरे उभे राहत आहेत ,एम आय एम ने देखील सुंडकेंना उमेदवारी दिली आहे ,काँग्रेसचे उमेदवार धंगेकर यांची कोंडी अशा पद्धतीसह त्यांच्या पक्षांतर्गत पातळीवरून ही होत आहे तर दुसरीकडे भाजपाने आता आपल्याही पक्षातील नाराजीला गंभीरतेने घेतल्याचे दिसून येते आहे. काल मुंबईतील भाजप नेते आशिष शेलार यांनी पुण्यातील माजी खासदार संजय काकडे यांची भेट घेतली . आणि त्यानंतर आज पुण्यातील भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी देखील आज काकडे यांची भेट घेतली . Chandrakant Patil Meets Sanjay Kakade

काकडे हे स्वतः लोकसभेसाठी इच्छुक असताना भाजपकडून प्रत्यक्षात माजी महापौर मोहोळ (Murlidhar Mohol)यांना उमेदवारी दिली गेली . यामुळे पक्षांतर्गत नाराजी पसरली आणि काकडे हे प्रचारात आणि एकूणच पक्षाच्या कामकाजात कुठे दिसत नाहीत असे चित्र निर्माण झाले त्यांच्यासह काही नगरसेवक देखील प्रचारापासून दूर राहू लागले आता एकूणच निवडणूक व्यूहरचनेत सर्व राजकीय पातळीवर आघाडीवर राहू पाहणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी या नाराजीचीही दखल गांभीर्याने घेतली असून काकडे यांची नाराजी दूर करून त्यांना पक्षाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु केल्याचे वृत्त आहे. संजय काकडे हे माजी राज्यसभा सदस्य आहेत , महापालिकेत भाजपाची सत्ता आणण्यात त्याचे मोठे योगदान होते, या शिवाय मराठा आणि बहुजन समाजात त्यांना मानणारा मोठा वर्ग सहाही विधानसभा मतदार संघात आहे . काकडे यांचे निवडणूक राजकारणापासून दूर राहणे नुकसानीचे ठरू शकते या विचाराने नेत्यांनी काकडे यांच्याशी संपर्क साधून चर्चा करत त्यांची समजूत काढून त्यांना मूळ प्रवाहात पुन्हा आणायचे प्रयत्न सुरु केल्याचे वृत्त आहे.