महा एनजीओ फेडरेशन व माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळाचा पुढाकार
पुणे : महा एनजीओ फेडरेशन व माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ यांच्या पुढाकाराने अतिदुर्गम आदिवासी भागातील गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले. दररोज ४ ते ५ किलोमीटर पायी चालणाऱ्या विद्यार्थ्यांनी सायकलवर स्वार होऊन उज्वल भविष्याची वाट शोधावी या उद्देशाने त्यांना सायकल देण्यात आल्या.
माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ व महा एनजीओ फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व आदिवासी कल्याण व संवर्धन संस्था यांच्या माध्यमातून ही मदत करण्यात आली. माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ शिवाजीनगर येथे झालेल्या कार्यक्रमप्रसंगी माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळाच्या सचिव सुशिला राठी, राजू आसावा, विनोद कारवा, मुकुंद शिंदे, नितीन साबळे, सुनील कोळपे, मनोज सूर्यवंशी तसेच विद्यार्थ्यांचे पालक ही उपस्थित होते.
कार्यक्रमात १५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन महा एनजीओ फेडरेशनचे संचालक अमोल उंबरजे व योगेश बजाज यांनी केले
शेखर मुंदडा म्हणाले, आदिवासी दुर्गम भागामध्ये विद्यार्थी प्राथमिक शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी घरापासून लांब असलेल्या शाळांमध्ये जातात. घर ते शाळा हे अंतर ते पायी चालत चालत जातात. शिक्षण घेणे त्यांना सोयीचे व्हावे आणि रोजचा वेळ वाचावा यासाठी सायकलींचे वाटप करण्यात आले.