मुंबई
भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा, मुंबईच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती शहराच्या विविध भागात उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील ३६ मंडलात भव्य मिरवणुका, व्याख्याने, अशा विविध उपक्रमातून डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी चैत्यभूमीवरील स्मृतिस्थळी जावून शेकडो अनुयायांसह दर्शन घेतले. तसेच येथे भरवलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनासही भेट दिली. कॅबिनेट मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा यांनीही चैत्यभूमीवर जात अभिवादन केले. विधानसभेचे सभापती आ. राहुल नार्वेकर यांनी इंदिरा गांधी नगर हाजीबंदर रोड (शिवडी) येथे “भीम समर्थक प्रीमिअर लीग” क्रिकेट सामन्यांना उपस्थिती दर्शवली.
खा. मनोज कोटक यांनी रमाबाई आंबेडकर नगर, घाटकोपर पूर्व येथे आयोजित कार्यक्रमात अभिवादन केले. आ. कॅप्टन तमिल सेल्वन यांनी भाजपा जनसंपर्क संपर्क कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन केले. आ. मिहिर कोटेचा यांनी घाटकोपर पूर्वेकडील आर. टी. ओ. वसाहत आणि माता रमाबाई आंबेडकर नगरमधील पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. आ. राम कदम यांनी घाटकोपर मधील आयोजित कार्यक्रमांना भेटी देऊन अभिवादन केले. आ. अमित साटम यांनी अंधेरी पश्चिम येथील बुद्ध नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित केली तसेच ध्वजारोहण केले. आ.भारती लव्हेकर यांनी जनसंपर्क कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन केले. आ. अतुल भातखळकर यांनी प्रतिमा पूजन केले. आ. सुनील राणे यांच्या उपस्थितीत धडक कामगार युनियन महासंघ तसेच धडक दिव्यांग मुकबधिर कामगार युनियनकडून युवा दिव्यांग मुकबधिर खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. आ. प्रवीण दरेकर यांनी अभिवादन केले. आ. प्रसाद लाड यांनी सायन कोळीवाडा येथील विश्वशांती बुद्ध विहारमधील रथाला वंदन केले. आ. राजहंस सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत दिंडोशी येथे कार्यक्रम घेण्यात आला.
मुंबई भाजपाच्या वतीने आयोजित कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा, मुंबईचे अध्यक्ष श्री. शरद कांबळे,सरचिटणीस राहुल कांबळे, मुंबई भाजपा सचिव प्रतिक कर्पे यांनी परिश्रम घेतले.