पुणे दि १४ -स्वातंत्र्योत्तर भारतात, प्रजा समजल्या जाणाऱ्या जनतेस समान मताचा अधिकार अर्पण करीत नागरीक बनवणारे स्वतंत्र भारताचे ‘संविधान’ हीच् खरी भारताची ओळख असुन, संविधानाचे मुल्य जपले तरच श्रेष्ठ भारत, नवा भारत, आत्मनिर्भर भारत होऊ शकतो अन्यथा केंद्रातील सत्तांधिशांच्या भारता विषयीच्या वल्गना व्यर्थ आहेत..! असे प्रतिपादन कांग्रेस नेते व राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी भारतरत्न डॅा बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी केले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाच्या वकील विभाग तर्फे महामानव डॅा आंबेडकरांचे प्रतिमेस काँग्रेस नेते गोपाळ यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी ॲड फैयाज शेख यांनी स्वागत – प्रास्ताविक केले. ॲड शहीद अख्तर यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी ॲड श्रीकांत पाटील, ॲड राजेंद्र काळेबेरे, ऍड. अतुल गुंड पाटील, ऍड. सुरेश देवकर, ऍड. विद्या पेळपकर, ऍड. अंजु डिसूझा, सुरेश नांगरे, ॲड बाळासाहेब बामणे, ऍड. वैभव कांबळे,राजू साठे, राजेश सुतार इत्यादी उपस्थित होते.आभार प्रदर्शन ऍड. विजय तिकोने यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, राजे शाही / निजाम शाहीत’ विभागलेल्या खंडप्राय भारतास, ब्रिटीशांच्या गुलामगिरीच्या जोखडातुन, अहिंसेच्या व मुत्सदेगिरीच्या मार्गाने सोडवण्याचे महतपुर्ण कार्य महात्मा गांधी, नेहरू, पटेल, आझाद, बोस आदिंनी केले.
भगतसिंह – राजगुरूंसह हजारो स्वातंत्र्य विरांच्या बलीदानामुळे व अविरत संघर्षामुळे देशास स्वातंत्र्य मिळाले ही वास्तवता आहे..!
तर डॅा बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे संघराज्य प्रणीत स्वंतत्र व प्रजासत्ताक भारताची ओळख जगासमोर निर्माण झाली हे वास्तव आहे.
त्यामुळे ‘भारतिय संविधान प्रती जागरूक रहाणे व संविधानाचे अर्थात् भारतिय राज्य-घटनेचे संरक्षण करणे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे. त्यामुळेच “लोकशाहीरुपी भारताची संविधान आधारीत वाटचाल हीच खऱ्या अर्थाने भारतरत्न डॅा बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली ठरेल” असे वक्तव्य या प्रसंगी काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केले..!आभार प्रदर्शन ॲड विजय तिकोणे यांनी केले.