हडपसर : शेवटच्या माणसामध्ये आत्मभान जागवणाऱ्या महामानवाची शिकवण आपल्या आचरणात असावी. त्याचबरोबर बदलत्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत संविधान वाचवण्याची ताकद सर्वांना मिळो, अस प्रतिपादन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज हडपसर येथे केलं
महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त हडपसर येथे अभिवादन करताना डॉ. कोल्हे बोलत होते. यावेळी वानवडी येथील संविधान चौकात डॉ. कोल्हे यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. तसेच सम्राट अशोक बोधी विहाराला भेट देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
डॉ. कोल्हे म्हणाले की, शेवटच्या रांगेतील शेवटच्या माणसाला आत्मभान देऊन त्याला जगण्याची ताकद आणि त्याच्या मनात स्वाभिमान पेरणाऱ्या महामानववाची शिकवण आपल्या आचरणात रोज असायला हवी.
आज देश अडचणीं चा सामना करत असताना जो राष्ट्रीय ग्रंथ त्यांनी आपल्याला दिला त्या भारताच्या संविधानाचे रक्षण करण्याची ताकद देशातील प्रत्येक नागरिकाला मिळायला हवी.
यावेळी महादेव बाबर, प्रशांत जगताप, रत्नप्रभा जगताप, प्रकाश म्हस्के, साहिल केदारी, विनय कदम, दिनेश गिरमे, अप्पा गिरमे, अमोघ गायकवाड, रविंद्र जांभुळकर, सतीश गवळी यांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते