पुणे/पिंपरी: देहूरोड दारूगोळा कारखान्याच्या भोवतीचे प्रतिबंधित क्षेत्र (Redzone)अर्थात रेड झोन कमी करण्याचा निर्णय घेऊन केंद्रातील मोदी सरकारने किवळे, रावेत भागातील रहिवाशांना मोठा दिलासा दिला आहे, असे मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (शनिवारी) सांगितले.
खासदार बारणे यांनी आज रावेत परिसरातील काही लोकप्रतिनिधी व मान्यवरांची (Redzone)घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली. नामवंत उद्योजक नंदकुमार भोंडवे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
त्यावेळी पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब नेवाळे, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शहर प्रमुख नीलेश तरस, युवा सेना जिल्हाप्रमुख राजेंद्र तरस, देहूगाव शहर प्रमुख सुनील हागवणे, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष रघुवीर शेलार तसेच प्रकाश भोंडवे, दिवाणजी भोंडवे, बाळासाहेब भोंडवे, सोमनाथ भोंडवे, राम भोंडवे, सुनील भोंडवे, दीपक भोंडवे, शांताराम भोंडवे, अतुल भोंडवे, सुनील मोरे आदी उपस्थित होते.खासदार बारणे म्हणाले, रेड झोनचा प्रश्न बराच गुंतागुंतीचा होता. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेऊन त्यांना या प्रश्नाचे गांभीर्य पटवून दिल्यानंतर संरक्षण मंत्रालयाने रेड झोनचे क्षेत्र कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रावेत, किवळे भागातील रेड झोन बाधित रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.