· प्रिमियम मोटरसायकलच्या (300cc – 500cc) विशेष श्रेणीसह मोटरप्रेमी लोकांचे लक्ष वेधून घेते
· होंडाच्या मोठ्या बाइक्ससाठी अत्याधुनिक वन–स्टॉप विक्री आणि सेवा केंद्र
ठाणे, 12 एप्रिल 2024: प्रिमियम मोटरसायकल पुनर्परिभाषित करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकत होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (HMSI) ने डोंबिवली, ठाणे (महाराष्ट्र) येथे होंडा बिगविंग या नवीन प्रीमियम मोटरसायकल विक्री आणि सेवा आऊटलेटचे उद्घाटन केले.
मोटारसायकलप्रेमी लोकांसाठी हे पाऊल अत्यंत आनंददायी आणि परिवर्तनशील असणार आहे. केवळ सर्वोत्तमाच्या शोधात असलेल्या बाईक रायडर्ससाठी हे BigWing डीलरशिप आऊटलेट एक सर्वोत्कृष्ट अनुभव देईल. ठाण्याच्या अगदी मध्यवर्ती भागात वसलेल्या या अत्याधुनिक केंद्राचा उद्देश नवीन तसेच सध्या असलेल्या ग्राहकांमध्ये #GoRidin चा उत्साह वाढवणे हा आहे.
आपल्या अमूल्य ग्राहकांची छोट्यातली छोटी गरज पूर्ण करण्यासाठी हे BigWing डीलरशिप आऊटलेट अत्यंत उपयोगाचे आहे. हे BigWing आता देशभरातील 140 हून अधिक ऑपरेशनल टचपॉइंट्सवर उपलब्ध होईल.
प्रीमियम अनुभव
ब्लॅक अँड व्हाईट मोनोक्रोमॅटिक थीमने प्रभावित बिगविंग आपली वाहने अत्यंत अभिमानाने मिरवते. BigWing मधील उच्च प्रशिक्षित आणि जाणकार व्यावसायिक ग्राहकांना त्यांची गाडी किंवा त्याच्याशी संबंधित ऍक्सेसरीज संबंधी प्रश्नांचे निराकरण करण्यास मदत करतात. आपल्याला कोणती गाडी हवी, कोणती सूट होईल आणि कोणती अत्यंत उपयोगी ठरेल अशा सगळ्या प्रश्नांची तपशीलवार उत्तरे (www.HondaBigWing.in) या वेबसाइट उपलब्ध आहेत. शोध ते खरेदीपर्यंतचा तुमचा प्रवास इथे संपेल. वेबसाइटवरील ऑनलाइन बुकिंगचा पर्याय ग्राहकांना जलद, पारदर्शक बुकिंग अनुभव एका क्लिकवर मिळवून देतो. रिअल–टाइम ग्राहकांचा अभिप्राय मिळवण्यासाठी, Honda BigWing सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
ग्राहकांची सुरक्षितता आणि सुविधा सुनिश्चित करून, Honda BigWing इमर्सिव्ह डिजिटल अनुभव देते. व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म – https://virtualshowroom.hondabigwing.in वर ग्राहकांना त्यांच्या घरात आरामात बसून मोटरसायकल लाइन-अप, राइडिंग गीअर्स आणि ॲक्सेसरीज तपशीलवारपणे अनुभवता येतील.
विविध उत्पादन पोर्टफोलिओ
Honda च्या प्रीमियम मोटरसायकल रिटेल फॉरमॅटचे नेतृत्व BigWing Topline करते. – सर्वोत्कृष्ट महानगरांमधील संपूर्ण प्रीमियम मोटरसायकल श्रेणीसाठी (300cc – 1800cc) तसेच केवळ मध्यम आकाराच्या मोटरसायकल विभागासाठी (300cc – 500cc) तसेच इतर गरजांसाठी BigWing उपलब्ध आहे. मोटारसायकलच्या विविध श्रेणींमध्ये सर्व–नवीन CB350, H’ness CB350, CB350RS, CB300F, CB300R, NX500, XL750 Transalp, आफ्रिका ट्विन आणि गोल्ड विंग टूर यांचा समावेश आहे.
ग्राहकांना ‘NX500’ सह संपूर्णपणे नवीन अनुभव
HMSI ने 2024 च्या कॅलेंडर वर्षाची सुरुवात रु. 5,90,000 (एक्स–शोरूम दिल्ली) च्या आकर्षक किमतीत संपूर्णपणे नवीन ‘NX500’ साहसी टूर लाँच केली. ‘डेली क्रॉसओव्हर‘ च्या डिझाईन थीमने सजलेले हे नवीन मॉडेल CBU* मार्गाने (*पूर्णपणे अंगभूत) भारतीय बाजारपेठेत प्रवेश करेल.
संपूर्णपणे नवीन असलेल्या Honda NX500 ला पॉवरिंग हे 471cc, लिक्विड–कूल्ड, 4-स्ट्रोक DOHC इंजिन आहे ज्यामध्ये समांतर ट्विन–सिलेंडर लेआउट आहे. यातील हाय–रिव्हिंग कॅरेक्टर आणि झॅपी टॉप एंडसह अत्यंत आनंददायी सफर होते. स्लिक–चेंजिंग 6-स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेली ही मोटर 8,600rpm वर 35kW पॉवर आणि 6,500rpm वर 43Nm पीक टॉर्क देते.