पुणे- स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणाऱ्या महात्मा जोतिबा फुले यांची जयंती पर्वती येथील अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेत साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरवात अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सरचिटणीस मा.सौ. प्रमिला गायकवाड, खजिनदार विजयसिंह जेधे यांचे हस्ते प्रतिमा पूजनाने झाली. या प्रसंगी सत्यशोधक समाजाचे संस्थापक व महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे थोर विचारवंत व समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांनी बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्र्य आणि जातिभेद पाहून सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरु करून महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. ‘शेतकऱ्याचा असूड’ या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता विशद केली. ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे तत्त्वचिंतक व्यक्तिमत्त्व होते. आपण सर्वांनी महात्मा फुलेंच्या कार्याचा व विचारांचा आदर्श घेण्याची गरजही कार्यक्रमासाठी मा.सौ. प्रमिला गायकवाड यांनी या वेळी व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी मा.सौ. प्रमिला गायकवाड, विजयसिंह जेधे,प्राचार्य डॉ.शुभदा घोलप,डॉ.विलास पाटील,प्रा.सागर गावंडे,डॉ.रविराज सोरटे,श्री.नितीन मुकणे,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.