पुणे : मानाचा पहिला श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या साल २०२४ ते २०२७ कालावधीसाठी विश्वस्त पदासाठी लोकशाही पद्धतीने निवडणूक झाली. एकूण ९ पुरुष विश्वस्त व २ महिला विश्वस्त या पदासाठी १७ पुरुष उमेदवार उभे राहिले होते. सौ. दिपा तावरे व सौ. पल्लवी नेऊरगावकर या २ महिला विश्वस्तांची बिनविरोध निवड झाली. निवडणुकीसाठी उभे राहिलेले उमेदवार श्री. श्रीकांत शेटे, श्री. निलेश वकील, अॅड. ऋग्वेद निरगुडकर, श्री. सूरज गाढवे, श्री. अक्षय ढेरे, श्री. भूषण रुपदे, श्री. सौरभ धोकटे, श्री. आशुतोष शेरे, श्री. मंदार देशपांडे, श्री. मोरेश्वर घोळे, श्री. भूषण ढेरे, श्री. वरद ठकार, श्री. विशाल चौधरी, श्री. सचिन म्हसवडे, श्री. गिरीश देशपांडे, श्री. दर्शन भुतडा, श्री. आशुतोष वैद्य या उमेदवारांपैकी निवडून आलेले उमेदवार खालील प्रमाणेः
- श्री. श्रीकांत शेटे : अध्यक्ष
2.श्री. सूरज गाढवे :- उपाध्यक्ष
- सौ. दिपा तावरे :- सचिव
- श्री. अक्षय ढेरे: सहसचिव
- श्री. भूषण रुपदे :- कोषाध्यक्ष
- अॅड. ऋग्वेद निरगुडकर :- सह कोषाध्यक्ष
- श्री. आशुतोष शेरे :- सह कोषाध्यक्ष
- श्री. निलेश वकील: कार्याध्यक्ष
- श्री. मंदार देशपांडे :- स्वागताध्यक्ष
- सौ. पल्लवी नेऊरगावकरः हिशोब तपासनीस
- श्री. सौरभ धोकटे :- समन्वयक
अध्यक्ष श्री श्रीकांत शेटे यांची निवड एकमताने झाली. निवडणूक अधिकारी म्हणून अॅड. दीप्ती माहूरकर यांनी काम पाहिले व सर्व निवडणूक प्रक्रिया पार पडली.