पुणे: ” प्रत्येकात एक कवी लपलेला असतो त्याचा शोध घेता आला पाहिजे. आजू बाजूच्या घडामोडींचा, वास्तवाचं बारकाईने निरीक्षण केल्यास त्याचे भाव सहज कवितेतून उमटतातं. कविता स्वतः जगते आणि कवी व कवयित्रीला जगवतात.”असे विचार बोल्ड कवी म.भा. चव्हाण यांनी व्यक्त केले.
तितिक्षा इंटनॅशनलच्या वतीने ‘कथा लेखणीची..प्रचिती संस्कृतीची’ या पहिल्या आंतरराष्ट्रीय सहजारोग्य साहित्यिक, सांस्कृतिक अभियान अंतर्गत आयोजित भव्य काव्य करडंक स्पर्धा २०२४ मध्ये ते बोलत होते.
या वेळी मिसेस युनिव्हर्स डॉ. प्रचिति पुंडे, काकडे देशमुख शिक्षण संस्थेचे प्रमुख शरदचंद्र काकडे देशमुख, ज्येष्ठ साहित्यिक मधुसूदन घाणेकर, ज्येष्ठ साहित्यिक व प्रकाशक वि.ग. सातपुते, नाट्यदिग्दर्शक सतीश इंदापूरकर, कवी म.भा. चव्हाण, गुलाब सम्राट बाबा ठाकूर, अॅड. रविंद्र भवार ,सोल्यूशनमाइंड चे सर्वेसर्वा श्री.सुजित दातार आणि लेखक, दिग्दर्शक व सिनेकलाकार चेतन चावडा यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी तितिक्षा काव्य करंडकचा प्रथम क्रमांक बालकवी मृण्मयी काळे हिने पटकविला. द्वितीय पल्लवी पवार आणि गणपत तरंगे व महादेव लांडगे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. तसेच विवेकानंद काव्यलेखन स्पर्धा, तितिक्षा मंदाश्री काव्यगौरव पुरस्कार, तितिक्षा माई गौरव पुरस्कार, तितिक्षा अमृत गौरव, तितिक्षा समाजभूषण पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच मिसेस.यश वालिया, कलावती सुर्वे, अंजली महाजन, प्रियंका बोरकर, सुनिता मुरलीधरन, सुपर्णा वाबळे, आरती केरकर आदि महिलांचा नारी सन्मानाने पुरस्कृत करण्यात आले. त्याच प्रमाणे चेतन चावडा यांना ‘तितिक्षा हास्यगौरव दादा कोंडके स्मृती पुरस्कार २०२४’ ने गौरविण्यात आले.
म.भा. चव्हाण म्हणाले,” कवितेत दुःख, सुख, विरह, आनंद, हास्य या सारख्या रसांचा समावेश असतो. ती आपल्यापेक्षा वेगळी नसते. कल्पना आणि वास्तव यांचा समन्वय साधत ती जन्माला येते. याची भाषा हदयापासून हदयापर्यंत पोहचणारी असते. मनातील असंख्य विचारांना शब्दात मांडत ते रसिकापर्यंत पोहचविण्याचे कार्य कवी करतो.”
मधुसूदन घाणेकर म्हणाले, “स्वतःचे समाधान झाल्याशिवाय कविता पूर्ण होत नाही. कवित ही जगण शिकविते. त्यामुळे जो कवितेत जगतो तो उत्तम कवि असतो.”
वि.ग. सातपुते म्हणाले लिहीते व्हा. भावनांना शब्दरूपात व्यक्त करण्याच उत्तमोत्तम माध्यम म्हणजे कविता असते. ही अंतःकरणातून आली पाहिजेत. तसेच रचनेत काव्य मुक्त असायला हवे तेंव्हाच ती कविता प्रभावी होत असते. जो पर्यंत कवितेला आशय विषय, भाव, लय कळत नाही तो पर्यंत कवितेतून काय म्हणायचं आहे कळत नाही.
या नंतर तितिक्षा समाजभूषण पुरस्काराचे मानकरी..डॉ.अमित तथा आम्रपाली लक्ष्मी मोहिते.
..डॉ. प्रचिती पुुंडे, प्रिया दामले व चेतन चावडा यांनी आपले विचार मांडले.
सूत्रसंचालन सुवर्णा जाधव व योगेश हरणे यांनी केले.
‘तितिक्षा हास्यगौरव दादा कोंडके स्मृती पुरस्कार’ चेतन चावडा यांना प्रदान तर तितिक्षा काव्य करंडकचा प्रथम मानकरी मृण्मयी काळे .
Date: