बॉलिवूडचा तरुण अँक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफ आणि खिलाडी अक्षय कुमार यांनी त्यांच्या आगामी ॲक्शनर ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ची रिलीज डेट शेअर केली आहे. बहुप्रतिक्षित ट्रेलर २६ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे आणि ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अवघ्या दोन आठवड्यां नंतर 10 एप्रिल रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
टायगरने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर प्रेक्षकांना ट्रेलरच्या रिलीजच्या तारखेसह तसेच चित्रपटाची माहिती दिली.
“रियल एक्शन का एक बडा डोस लेने आ रहे हैं #बडेमियांछोटेमियां! #बडेमियांछोटेमियांचा ट्रेलर २६ मार्चला! 10 एप्रिल रोजी सिनेमा प्रदर्शित होईल!”
https://www.instagram.com/p/C41-lLyr-vD/?igsh=dGh1bm9nM3Bsazh6
प्रेक्षकांमध्ये #TheTigerEffect पाहण्याची अपेक्षा गगनाला भिडली आहे कारण हा चित्रपट अभिनेत्याच्या उत्कृष्ट चित्रपटसृष्टीत आणखी एक भर पाडणार आहे. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ व्यतिरिक्त टायगर श्रॉफ त्याच्या आगामी ‘रॅम्बो’, ‘सिंघम अगेन’ आणि नुकत्याच जाहीर झालेल्या ‘बागी 4’ या चित्रपटांमध्ये #TheTigerEffect दाखवण्यासाठी सज्ज आहे.