· चाळीस वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या कुटुंबाला विमायोजना खरेदी करतेवेळी प्रीमियममध्ये ५ टक्क्यांची सूट. ही सूट नूतनीकरणाच्या वेळीही राहणार कायम.
· विम्याची रक्कम पुनर्संचयित करण्यासाठी ‘रिस्टोर इन्फिनिटी’सारखा पर्याय
· अगोदरपासून अस्तित्वात असलेल्या आजारांसाठी (प्री-एक्झिस्टिंग डिसीज – पीईडी) विशिष्ट परिस्थितीत प्रतीक्षा कालावधी ४८ महिन्यांवरून ३० दिवसांपर्यंत कमी करण्याचा पर्याय.
मुंबई, २८ नोव्हेंबर २०२३ : ‘टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड’ या सर्वसाधारण विमा क्षेत्रातील कंपनीने ‘हेल्थ सुपरचार्ज’ या नावाची एक विशेष आरोग्यविमा योजना सादर केली आहे. त्यात विमाराशीच्या पाच पटींनी अधिक एवढे विमाकवच ग्राहकांना मिळणार आहे. आरोग्यसेवा क्षेत्रातील वाढत्या खर्चावर ग्राहकांना मात करता यावी, याकरीता ही विशेष योजना कंपनीने आणली आहे. मोठ्या महानगरांपासून लहान गावांपर्यंत सर्व कुटुंबांच्या आरोग्यसेवांच्या विविध गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने ‘हेल्थ सुपरचार्ज’ योजना काळजीपूर्वक रचण्यात आली आहे.
‘टाटा एआयजी हेल्थ सुपरचार्ज’ या पॉलिसीमध्ये पाच लाख ते वीस लाख रुपयांपर्यंतचा आरोग्यविमा काढता येतो. कुटुंबाच्या हितांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने ही एक समग्र स्वरुपाची पॉलिसी आहे. ग्राहकांना त्यांच्या भौगोलिक स्थानाच्या आधारावर या पॉलिसीचे दोन पर्याय (व्हॅल्यू प्लॅन आणि जिओ प्लॅन) उपलब्ध असतील. आपापल्या गरजांनुसार ते या योजनेंतर्गत उपलब्ध असलेले इतर पर्यायी लाभही निवडू शकतात. टाटा एआयजीचे देशभरात १० हजारांपेक्षा जास्त रुग्णालयांचे विस्तृत नेटवर्क आहे. त्यांतून ग्राहकांना आपल्या वैद्यकीय गरजांनुसार उत्कृष्ट आरोग्यसेवा मिळू शकेल.
‘टाटा एआयजी हेल्थ सुपरचार्ज’ या नवीन आरोग्यविमा पॉलीसीबद्दल अधिक माहिती देताना ‘टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कंपनी लि.’चे आरोग्य उत्पादने व प्रक्रिया विभागाचे वरिष्ठ उपप्रमुख डॉ. संतोष पुरी म्हणाले, “टाटा एआयजीमध्ये आम्ही आमच्या ग्राहकांच्या आरोग्याला प्राधान्य देण्यावर भर देतो. ग्राहकांना कोणताही तडजोड न करता नाविन्यपूर्ण आरोग्यविमा योजना मिळाव्यात, यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असतो. हेल्थ सुपरचार्ज सादर करून आम्ही पॉलिसीधारकांना त्यांच्या आरोग्यासाठी ५ पटींनी अधिक कव्हरेज प्रदान करू शकू. जीवनशैलीशी संबंधित आजारांच्या प्रमाणात वाढ होत असलेल्या सध्याच्या जगात, ही विमा पॉलिसी म्हणजे ग्राहकांना उत्कृष्ट आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या आमच्या समर्पणाचा पुरावाच आहे. सर्वांचे आरोग्य ५ पट अधिक कव्हरेजसाठी पात्र असल्यामुळे आम्ही ही योजना त्या दृष्टीने डिझाइन केली आहे. ती सानुकूलित, परवडणारी असून निरोगीपणा व प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा यांच्यावर भर देणारी आहे.”
‘टाटा एआयजी हेल्थ सुपरचार्ज’ची प्रमुख वैशिष्ट्ये :
· पाच पट सुपरचार्ज बोनस : या विमा योजनेमध्ये पाच पट सुपरचार्ज बोनसच्या माध्यमातून ग्राहकांना वाढीव कव्हरेज मिळते. त्यातून ग्राहकांच्या कुटुंबांसाठी सर्वसमावेशक विमासंरक्षण सुनिश्चित होते. या पॉलिसीच्या प्रत्येक नूतनीकरणावर पॉलिसीच्या मूळ विमाराशीच्या ५० टक्के इतका बोनस मिळतो, तसेच पॉलिसी वर्षात ग्राहकाने कितीही वेळा क्लेम दाखल केला, तरीही मूळ विमाराशीच्या ५०० टक्क्यांपर्यंतचा जास्तीत जास्त बोनस पॉलिसीधारकाच्या नावावर जमा होतो.
· तरुण कुटुंबाना विशेष सवलत, जी कायम मिळत राहते : पॉलिसीच्या खरेदीवेळी कुटुंबातील सर्व सदस्यांचे वय ४० वर्षांपेक्षा कमी असेल, तर त्या कुटुंबाला अतिरिक्त ५ टक्के सवलत मिळू शकते. संबंधित कुटुंबाने कितीही वेळा क्लेम दाखल केले, तरी ही सवलत पॉलिसीच्या नूतनीकरणावरदेखील लागू होते. तरुण व्यक्तींनी आरोग्यविम्याचे लाभ अधिक संख्येने मिळवावेत, याकरीता ही विशेष तरतूद करण्यात आली आहे.
· परवडणारे प्रीमियम : ‘टियर-थ्री’ व ‘टियर-फोर’ शहरांतील लोकसंख्या, तसेच परवडणारी पॉलिसी घेऊ इच्छिणारे ‘टियर-वन’ व ‘टियर-टू’ शहरांतील ग्राहक, यांना योग्य ठरेल असे प्रीमियमचे स्वरूप.
· सानुकूल करण्याजोगे पर्याय : ‘व्हॅल्यू प्लॅन’ आणि ‘जिओ प्लॅन’ अशा दोन लवचिक स्वरुपाच्या प्रकारांमध्ये ही पॉलिसी उपलब्ध आहे. अमर्यादित पुनर्संचयन, तसेच अगोदरपासून असणाऱ्या काही विशिष्ट आजारांसाठीचा (पीईडी) प्रतीक्षा कालावधी कमी करण्यासारखे पर्यायी लाभ मिळविण्याची सोय.
· अंगभूत स्वरुपातील निरोगीपणाच्या सेवा व निरोगीपणासाठीचे उपक्रम : आमच्या ग्राहकांना आरोग्य आणि हित कायम चांगले राखता यावे व स्वतःची देखभाल करता यावी, याकरीता विशेष सुविधा.
· प्रतिबंधात्मक वार्षिक आरोग्य तपासणी : ग्राहकाने पॉलिसीच्या वर्षभरात कितीही क्लेम दाखल केले, तरी अतिरिक्त प्रीमियम भरून एकदा आरोग्य तपासणी करून घेण्याची सोय.