पुणे, दि. १५ : पुणे जिल्ह्यातील तलाठी संवर्गातील गट ‘क’ पदाची अंतिम निवड यादी व अंतिम प्रतिक्षा यादी जिल्ह्याच्या pune.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अंतिम निवड यादीतील उमेदवारांनी १६ मार्च रोजी तर अंतिम प्रतिक्षा यादीतील उमेदवारांनी १७ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल शाखा, ‘अ’ विंग, दुसरा मजला, पुणे येथे सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत त्यांचे मूळ कागदपत्रे २ संचासहीत तपासणी करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.