येथे जातीय दंगली कधीही आणि केव्हाही …प्रकाश आंबेडकर यांनी केले अलर्ट
पुणे-ज्यांनी ब्रिटीश काळात धार्मिक आणि सामाजिक स्वातंत्र्यासाठी वेगवेगळ्या लोकांनी लढा दिला. तेव्हा धार्मिक स्तंवात्र्यासाठी लढणाऱ्यानी सामाजिक स्वातंत्र्यासाठी जे लढले त्यांना ब्रिटीशांचे हस्तक ठरवले आज पुन्हा तीच परिस्थिती दिसते ,ज्यांनी त्यावेळेस धार्मिक हस्तक्षेप होतोय आणि आमच्या वैदिक धर्मावर आघात होतोय असा कांगावा केला होता त्यांनीच आता नवा कांगावा सुरु केला आहे ,कि या देशात हिंदूंचे राज्य असूनही या देशाला हिंदूंचे राष्ट्र असे संबोधित करावे असा लढा चाललेला आहे मी दुर्दैवाने असे म्हणेन या लढ्याचे गांभीर्य लोकांसमोर आलेले नाही ,आणि पुन्हा वैदिक परंपरा या देशात सुरु व्हावी यावरती संविधानावर बदलणार अशी घोषणा आहे , संघ ,हिंदू परिषद बोलत नाही ,पण फडणवीस हेच म्हणतात आम्ही संविधान बदलणार नाही , आमचे आवाहन आहे हेच
जोपर्यंत आरआरएसचे प्रमुख मोहन भागवत हे जोपर्यंत अस वक्तव्य करत नाही, तोवर आम्ही हे मान्य करणार नाही, असे सांगत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी येथे जातीय दंगली कधीही आणि केव्हाही होऊ शकतात राज्यात अनेक ठिकाणी 3 डिसेंबरनंतर दंगलींची शक्यता आहे. सगळ्या पोलिस स्टेशन्सला तसा अलर्ट आला आहे,असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तर 6 डिसेंबरनंतर काहीही होऊ शकते अशी पोलिसांना सूचना आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.सध्या देशात मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा, मिझोरम या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक चालू आहेत. या सर्व राज्यांच्या निवडणुकीचा निकाल ३ डिसेंबर रोजी लागणार आहे. या निवडणुकींच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी हे मोठं वक्तव्य केलं होतं.
दरम्यान प्रकाश आंबेडकर म्हणाले की, राज्यात अनेक ठिकाणी दंगलग्रस्त परिस्थिती आहे. प्रत्येक पोलिस स्टेशनला सतर्क करण्यात आले आहे. कुठल्याही परिस्थितीत 6 डिसेंबरनंतर काहीही घडू शकते. तर देशात मुस्लिमांना आणि ओबीसींना टार्गेट केले जात आहे. असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी पुण्यातील महात्मा फुलेवाड्यात अभिवादन केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत असताना केला आहे देशातलं वातावरण अस्थिर असून दंगली घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा दावा त्यांनी अलिकडच्या काही महिन्यांमध्ये अनेकदा केला आहे. आता पुन्हा एकदा त्यांनी अशाच प्रकारचं वक्तव्य केलं आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, येत्या सहा डिसेंबरनंतर म्हणजेच महापरिनिर्वाण दिनानंतर देशात काहीही घडू शकतं. हवं तर तुम्ही कोणत्याही पोलीस ठाण्यात जाऊन चौकशी करा, कारण तशा पद्धतीच्या सूचना पोलिसांना मिळाल्या आहेत.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, चार राज्याच्या निवडणूका झाल्यानंतर घडेल. मुस्लिम आणि ओबीसी आरक्षण टार्गेट केले जात आहे. समाजात अशांतता पसरवली जाते आहे. आंदोलनाशी संबंध नसलेल्यांचा वापर केला जात आहे.राज्यात आरक्षणाच्या नावाखाली समाजासमाजाला एकमेकांविरोधात लढवले जात आहे. ते थांबण्याएवजी त्याला खतपाणी घातले जाते असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
छगन भुजबळ यांना जेलमधून बाहेर काढणारा मीच होतो.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या ओबीसी आरक्षणाबाबतच्या भूमिकेवर भाष्य केलं. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी महत्वाचं विधान केलं. आता परत मला इतिहास सांगयची गरज नाही. मंडल आयोगाबाबतचा इतिहास पाहा तुम्हाला कळेल. छगन भुजबळ यांना जेलमधून बाहेर काढणारा मीच होतो. न्यायालयात पलटवार मीच केला. त्यांनी त्याबाबत कधी माझे आभार मांडले नाहीत. मला कोणत्याही व्यक्तीची गरज नाही. जरा इतिहास सुधारून घ्या. मग कळेल… ओबीसीचा लढ्याचा जनक मी आहे, असे त्यांनी म्हटले आहे.