पुणे- बिबवेवाडी परिसरात गॅरेजमधील चारचाकी वाहनांना आग लागली आहे. शुक्रवारी पहाटे ही लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाकडून गंगाधाम, कोंढवा खुर्द आणि दोन वॉटर टँकर रवाना करण्यात आले होते. ही आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही.
दरम्यान, आगीमध्ये गॅरेजमधील एकूण 17 चारचाकी वाहने जळाली आहेत. यामध्ये बीएमडब्ल्यु, मर्सिडीज, रेंज रोव्हर, स्कोडा, हुंदाई, फोर्ड या कंपन्याची वाहने दुरूस्तीकरता आले असल्याचे समजले. तसेच सदर गॅरेजचे नाव हे मतीन कार केअर्स अस आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवितहानी झालेली नाहीय.
तीस मिनिटात आग आटोक्यात
घटनास्थळी पोहोचताच मोकळ्या जागेत असलेल्या गॅरेजमधील गाड्यांना आग लागल्याचे अग्निशमन दलाच्या निदर्शनास आले. अग्निशामक दलाच्या जवानांनी आतमध्ये कोणी कामगार नसल्याची खाञी केली. त्यानंतर चारही बाजूने पाण्याचा मारा करून सुमारे तीस मिनिटात आग आटोक्यात आणत आणि कुलिंग ऑपरेशन सुरू ठेवले.आगीत अनेक महागड्या गाड्या आगीत भस्म झाल्यामुळे गॅरेज मालकाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. या कामगिरीत अग्निशमन अधिकारी संजय रामटेके, कैलास शिंदे, तांडेल मनीष बोंबले, महादेव मांगडे, फायरमन शैलेश गोरे, राजेश घडशी, निलेश वानखडे, वैभव राऊत, कुणाल खोडे, मंदार नलावडे यांनी सहभाग घेतला.