पुणेः भारतीय मिनी गोल्फ संघटनेच्या मान्यतेने व महाराष्ट्र मिनीगोल्फ असोसिएशनच्या वतीने विभागीय क्रीडा संकुल, मनकापूर (नागपूर) येथे घेण्यात आलेल्या ९व्या वरिष्ठ (पुरुष आणि महिला) मिनी गोल्फ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यपीठाच्या प्रांजली सुरदुसे हिने महाराष्ट्र वरिष्ठ महिला संघाचे प्रतिनिधित्व करताना रौप्य पदकाची कमाई केली.तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेच्या महिला गटात उत्तराखंड संघाने पहिला क्रमांक मिळवित सुवर्ण, तर महाराष्ट्रा संघाने रौप्यपदकावर आपली मोहर उमठवली. तर मध्यप्रदेश संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. प्रांजलीने अगदी लहाण वयापासूनच मिनी गोल्फ खेळायला सुरुवात केली. त्यासाठी तिला वडील विनोद सुरदुसे यांनी मार्गदर्शन केले.त्यानंतर तिला एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या प्रियंका जाधव यांचेही मार्गदर्शन लाभले.तिच्या या रौप्य कामगिरी नंतर विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, मिनीगोल्फ फेडरेशनचे मुख्य सचिव डाॅ.सुरज सिंग यवतीकर, प्र.कुलगुरू.डॉ.अनंत चक्रदेव, डॉ.रामचंद्र पुजेरी, डॉ. मोहित दुबे, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, क्रीडा विभागाचे संचालक पद्माकर फड, विद्यार्थी कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक डाॅ.सुराज भोयार यांनी अभिनंदन केले आहे.