· १६ ते १८ मार्च २०२४ दरम्यान या तीन दिवसीय सर्व्हिस कॅम्पचे आयोजन. शहरातील २०१९-२०२० मॉडेल्सच्या जावा मोटरसायकल ग्राहकांना सेवा देण्याचे ध्येय
· ग्राहकांच्या मदतीसाठी आघाडीचे ओरिजनल इक्विपमेंट उत्पादक कॅम्पमध्ये हजेरी लावणार
पुणे, १४ मार्च २०२४ : जावा येझ्दी मोटरसायकल्स आपला यशस्वी मेगा सर्व्हिस कॅम्प पुणे, महाराष्ट्रात येथे आयोजित करण्यासाठी सज्ज आहे. राज्यभरात विविध ठिकाणी या तीन दिवसीय कॅम्पचे यशस्वी आयोजन केल्यानंतर पुण्यात १६ ते १८ मार्च २०२४ दरम्यान हा कॅम्प घेतला जाणार आहे. कॅम्पमध्ये २०१९- २०२० मॉडेल्सच्या जावा मोटरसायकल ग्राहकांना सेवा दिली जाणार आहे.
हा सर्व्हिस कॅम्प तीन ठिकाणी घेतला जाईल:
o शक्ती ऑटोमोबाइल्स – प्लॉट क्रमांक जीपी- १८७, लोअर ग्राउंड ड्रीमहाउस (मारूती ग्रुप थरमॅक्स चौक) चिंचवड, पुणे, महाराष्ट्र ४११०१९
o ग्रीन गिझर्स मोबिलिटी – गेट क्रमांक ४, एस. नं. ५८२, प्लॉट क्रमांक आर-2२६, ओल्ड पाटील गराज ज्योती पान शॉप लेन, मार्केट यार्डसमोर, गुलटेकडी, पुणे, महाराष्ट्र ४११०३७
o सनश्राइन व्हेंचर्स – ६६ गुरुछाया अपार्टमेंट, कर्वे रस्ता, नळ स्टॉप, पुणे, महाराष्ट्र ४११००४
या कॅम्पमध्ये २०१९- २०२० मॉडेल्सच्या जावा मोटरसायकल ग्राहकांना त्यांच्या गाडीची संपूर्ण तपासणी आणि निवडक भागांचे मोफत रिप्लेसमेंट करून मिळेल. आघाडीचा ओरिजनल इक्विपमेंट पुरवठादार या कॅम्पमध्ये सहभागी होऊन ग्राहकांना मदत करणार असून त्यात मोतुल, अमारॉन, सीएट यांचा समावेश आहे. ग्राहकांना दीर्घकालीन सेवा देण्याच्या बांधिलकीतून जावा येझ्दी मोटरसायकल्सने मोटरसायकलच्या मूल्यांकनावरून मोफत वाढीव वॉरंटी देण्याचे ठरवले आहे. त्याशिवाय एक्सचेंज मूल्य जाणून घेत अपग्रेडिंगमध्ये रस असलेल्या ग्राहकांसाठी ग्राहकांसाठी खास झोन तयार केला जाणार आहे.
आधीच्या १४ सर्व्हिस कॅम्पना मिळालेला यशस्वी प्रतिसाद व त्यामध्ये करण्यात ३४५५ पेक्षा जास्त जावा मोटरसायकल्सचे सर्व्हिसिंग करण्यात आले असून कंपनीने मार्च अखेरपर्यंत १०,००० बाइक्सच्या सर्व्हिसिंगचे करण्याचे ठरवले आहे. ब्रँडद्वारे येत्या काही महिन्यांत वेगवेगळ्या शहरात मेगा सर्व्हिस कॅम्प्सचे आयोजन केले जाणार आहे. या उपक्रमातून ब्रँडची ग्राहक समाधानाला प्राधान्य देण्याची व दर्जेदार ओनरशीप एक्सपिरियन्स देण्याची बांधिलकी दिसून आली आहे.
जावा येझ्दी मोटरसायकल्सच्या ग्राहकांना त्यांच्या जवळच्या ब्रँड वितरकाकडे आपला स्लॉट राखून ठेवण्याची विनंती करण्यात आली आहे. आपल्या मोटरसायकलचे दर्जेदार सर्व्हिसिंग करण्याची व सर्वोच्च ग्राहक समाधान मिळवण्याची ही संधी चुकवू नये.