· राम लल्ला ५० ग्रॅम सिल्व्हर बार, ९९.९९+ टक्के शुद्धतेसह, नवीन राम लल्ला मूर्तीच्या प्रतिमेसह, पाठीमागे राम मंदिराची प्रतिकृती कोरलेली.
· हे नवे उत्पादन एमएमटीसी- पॅम्पची भक्तांना प्रभू श्रीरामाप्रती आपली भक्ती शुद्ध चांदीतून व्यक्त करण्याची संधी मिळवून देण्याची बांधिलकी दर्शवणारे
मुंबई : एमएमटीसी- पॅम्प पॅम्प या भारतातील एकमेव लंडन बुलियन मार्केट असोसिएशन (एलबीएमए) गुड डिलीव्हरी सोने आणि चांदी रिफायनरीला , ९९.९९+ टक्के शुद्धतेसह, राम लल्ला ५० ग्रॅम सिल्व्हर बार लाँच करताना अभिमान वाटत आहे. हे खास तयार करण्यात आलेले बार प्रभू श्रीरामाप्रती भक्ती दर्शवणारे असून त्यावर पुढील बाजूस राम लल्लाची मूर्ती रंगीत थ्रीडीमध्ये कोरण्यात आले असून मागील बाजूस प्रसिद्ध राम मंदिर आहे.
जगभरातील लाखो भक्तांसाठी प्रभू श्रीराम श्रद्धेचं स्थान आहेत. भगवान विष्णूचा सातवा अवतार मानले गेलेले प्रभू श्रीराम सत्य, न्याय आणि नैतिक सचोटीचे प्रतीक आहेत. रामायणात वर्णन केल्याप्रमाणे त्यांचा असामान्य प्रवास हा चांगुलपणाने वाईटावर केलेला विजय असून तो विश्वास व भक्तीची ताकद दाखवणारा आहे.
या घोषणेविषयी एमएमटीसी- पॅम्पचे प्रवक्ते म्हणाले, ‘राम मंदिर आणि पवित्र राम लल्ला मूर्तीच्या प्रतिष्ठापनेने संपूर्ण भारत आनंदित झाला असून या ऐतिहासिक क्षणाच्या निमित्ताने राम लल्ला सिल्व्हर बार लाँच करताना एमएमटीसी- पॅम्पला अभिमान वाटत आहे. शुद्ध चांदीत बनवण्यात आलेले खास डिझाइन, स्विस कारागिरी आणि प्रतिकात्मता यामुळे हा सिल्व्हर बार प्रभू श्रीरामांच्या अवताराला आदरांजली वाहाणारा आणि सत्य आणि स्वर्गीय शांतीचा संदेश देणारा आहे.’
राम मंदिरातील प्राण प्रतिष्ठा समारंभात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीत प्राण फुंकण्यात आले व हा क्षण हिंदू दिनदर्शिकेत सर्वात महत्त्वाचा ठरला. हा अध्यात्मिक प्रबोधनाचा काळ असून या निमित्ताने सर्व भक्तगण एकत्र येऊन आपल्या आवडत्या दैवतेची सेवा करत समृद्धी, शांतता व एकोप्यासाठी त्याचे आशीर्वाद मागत आहेत.
एमएमटीसी- पॅम्प राम लल्ला सिल्व्हर बार या पवित्र सोहळ्याचे स्मरण करून देणारा, भक्तांना त्यांच्या भक्तीचे जवळ ठेवण्याजोगे प्रतीक मिळवून देणारा आहे. हा बार ९९.९९+ टक्के शुद्ध चांदीत आणि नाजूक कलाकुसरीत तयार करण्यात आलेला असून ग्राहकांना प्रत्येक बारचे मूल्य व अस्सलपणा सहज लक्षात येईल. राम लल्ला सिल्व्हर बार भक्ती व अध्यात्माचे कालातीत चिन्ह असून स्मरणचिन्ह म्हणून ठेवण्यासाठी व पिढ्यानपिढ्या जपण्यासाठी योग्य आहे.
राम लल्लाची संपूर्ण प्रतिमा या बारवर असून भगवान विष्णूच्या १० अवतारांचे तपशील तसेच हनुमान व गरूडाची प्रतिमाही आहे. ही चिन्हे प्रभू श्रीरामांच्या लाखो भक्तांसाठी अतिशय महत्त्वाची आहेत. ही भावना जपणाऱ्या या सिल्व्हर बारच्या मागील बाजूस राम मंदिराची रंगीत प्रतिमा कोरण्यात आली आहे.
एमएमटीसी- पॅम्पतर्फे तयार करण्यात आलेले प्रत्येक उत्पादन शुद्धीकरणाची कठोर प्रक्रिया करून ९९९.९+ शुद्धतेची खात्री केली जाते. एमएमटीसी- पॅम्पच्या प्रत्येक उत्पादनावर एक अनोखा क्रमांक दिलेला असतो व ते असेयर प्रमाणित मिंटेड कार्डमध्ये पॅक केलेले असते.
एमएमटीसी- पॅम्पकडून खरेदी केलेले सोने व चांदीच्या प्रत्येक उत्पादनाचा वेट टॉलरन्स पॉझिटिव्ह असल्यामुळे प्रत्येक नाणे किंवा बारचे वजन नोंदवलेल्या वजनापेक्षा जास्त असते. यामुळे ग्राहकांना त्यांच्या गुंतवणुकीचे जास्त मूल्य मिळते.