· बँकॉकनंतरचे थायलंडमधील दुसरे ठिकाण
· आग्नेय आशिया आणि अतीपूर्वेतील भागात आपले अस्तित्व आणि कनेक्टिव्हिटी विस्तारणार
गुरुग्राम, – एयर इंडिया ही भारतातील आघाडीची विमानकंपनी दिल्ली आणि थायलंडमधील लोकप्रिय ठिकाण फुकेतला जोडण्यासाठी १५ डिसेंबर २०२३ पासून विनाथांबा सेवा सुरू करत आहे. या सेवेमुळे या दोन्ही शहरांतील पर्यटन आणि व्यापाराला चालना मिळेल व आग्नेय आशिया आणि अतीपूर्वेकडील भागात सेवा विस्तार करण्याच्या कंपनीच्या योजनेला बळ मिळेल.
१६२ आसनी (इकॉनॉमीमध्ये १५० आणि बिझनेस क्लासमध्ये १२) A320निओ एयरक्राफ्ट एआय३७८ दिल्लीतून 0110 वाजता निघेल आणि त्याच दिवशी 0710 वाजता फुकेतमध्ये पोहोचेल. परतीचे विमान एआय३७९ फुकेतमधून 0810 वाजता निघेल आणि दिल्लीमध्ये 1050 वाजता (सर्व स्थानिक वेळेनुसार) पोहोचेल.
आठवड्यात चार फ्लाइट्ससह (सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार) ही सेवा सुरू होणार असून जानेवारी २०२४ मध्ये दररोज उपलब्ध होईल.
‘फुकेत हे लोकप्रिय जागतिक ठिकाण असून व्यवसाय आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. आमच्या नेटवर्कमध्ये फुकेतचा समावेश करताना आनंद होत आहे. यापुढेही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रात आम्ही कनेक्टिव्हिटी तसेच वारंवारता वाढवून ग्राहकांना निवडीस जास्त वाव देण्यासाठी प्रयत्नशील राहू,’ असे एयर इंडियाचे प्रमुख व्यावसायिक आणि ट्रान्सफर्मेशन अधिकारी निपुण अगरवाल म्हणाले.
एयर इंडियाद्वारे सध्या दर आठवड्याला बँकॉकला २६ विमाने कार्यरत असून त्यात दिल्ली व मुंबईतून रोज विनाथांबा विमानसेवा आणि कोलकातामधून आठवड्यात सहा विमानसेवांचा समावेश आहे. त्याशिवाय एयर इंडियाच्या प्रवाशांना बँकाकवरून थायलंड, लाओस, कंबोडिया अशा एयर इंडियाच्या इंटरलाइन भागिदारीचा भाग असलेल्या बँकॉक नेटवर्कवरील लोकप्रिय दहा ठिकाणांपर्यंत सेवेचा लाभ घेता येणार आहे.
विमानसेवांचे बुकिंग्ज आजपासून सर्व चॅनेल्सवर खुले होत असून त्यात एयर इंडियाचे संकेतस्थळ (www.airindia.com), मोबाइल अप आणि ट्रॅव्हल एजंट्स (ऑनलाइन ट्रॅव्हल एजंट्ससह) यांचा समावेश आहे.