पुणे -येथे घरफोडी व जबरी चोरी करणारे परप्रांतीय सुंदरसिंग भायानसिंग भुरीया (टोळी प्रमुख) व त्यांचे इतर ०३ साथीदार यांचेवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे . या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’दि.०६/१०/२०२३ रोजी आयोध्यानगरी, भाऊ पाटील रोड, बोपोडी, पुणे येथे फिर्यादी हे सिक्युरिटी गार्ड म्हणुन काम करीत असताना, यातील नमुद इसम१) सुंदरसिंग भयान सिंग भुरीया, वय-२५ वर्षे, रा. ग्राम पिपराणी, थाना तांडा, तहसिल कुक्षी, जि. धारा, मध्य प्रदेश (टोळी प्रमुख) २) मुकेश ग्यानसिंग भुरीया, वय-२७ वर्षे, रा. ग्राम पिपराणी, थाना तांडा तहसिल कुक्षी, जि. धारा, मध्य प्रदेश ३) सुनिल कमलसिंग आलावा, वय-२८ वर्षे, रा. ग्राम २२ वर्षे, रा. गांव तहसिल कुक्षी, थाना बागमेर, जि. धारा, मध्य प्रदेश राज्य ४) हरसिंग वालसिंग ओसनिया, वय-२२ वर्षे, रा. गांव तहसिल कुक्षी, थाना बागमेर, जि. धारा मध्य प्रदेश (टोळी सदस्य) यांनी संगनमत करुन, फिर्यादी यांना धक्का-बुक्की करुन जबरदस्तीने फिर्यादी यांचेकडील २१००/- रुपये रोख रक्कम चोरी करुन घेवुन गेले. त्याबाबत फिर्यादी यांनी खडकी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने खडकी पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. ३७४/२०२३ भा.द.वि. कलम ३९२,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल गुन्ह्याचे तपासा दरम्यान अटक करण्यात आली आहे. सुंदरसिंग भयानसिंग भुरीया आणि त्याच्या साथीदारांची पुर्व रेकॉर्ड पाहणी करता त्याने चोरी करणे, घरफोडी करणे व जबरी चोरी करणे असे गंभीर गुन्हे केलेले असुन, त्याने संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली असुन बेकायदेशीर मार्गाने स्वतःसाठी किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीसाठी गैरवाजवी आर्थिक फायदा व इतर फायदा मिळविण्याच्या उद्देशाने संघटीत गुन्हेगारी संघटनेचा सदस्य म्हणुन किंवा संघटनेच्या वतीने एकट्याने किंवा संयुक्तपणे हिसांचाराचा वापर करुन किंवा हिंसाचार करण्याची धमकी देवुन किंवा धाकदपटशा दाखवुन किंवा जुलुम जबरदस्ती करुन किंवा अन्य अवैद्य मार्गाने आपले बेकायदेशीर कृत्य चालु ठेवुन संघटना किंवा टोळी म्हणुन संयुक्तपणे गुन्हेगारी कृत्य करणारा गट तयार केला असुन त्याचेवर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करुन देखील त्याचे वर्तनात सुधारणा होत नसलेने त्यांनी पुन्हा-पुन्हा गंभीर स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत.दाखल गुन्ह्याचे तपासामध्ये आरोपीनी संघटीतरित्या सदरचा गुन्हा केल्याचे निदर्शनास आल्याने प्रस्तुत गुन्ह्यास महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३ (१) (ii) ३(२), ३ (४) चा अंतर्भाव करणे कामी खडकी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक,राजेंद्र सहाणे यांनी पोलीस उप- आयुक्त, परि-४, पुणे शहर, शशिकांत बोराटे यांचे मार्फतीने अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रदेशिक विभाग, पुणे रंजनकुमार शर्मा यांना प्रस्ताव सादर केला होता.
सदर प्रकरणाची छाननी करुन खडकी पोलीस स्टेशन येथे गु.नं. ३७४/२०२३ भा.द.वि. कलम ३९२, ३४ अन्वये दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३(१) (ii)३ (२), ३ (४) प्रमाणेचा अंतर्भाव करण्याची अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे रंजनकुमार शर्मा यांनी मान्यता दिलेली आहे.
सदर गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलीस आयुक्त, खडकी विभाग, पुणे शहर, श्रीमती. आरती बनसोडे ह्या करीत आहेत
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त, पुणे शहर, रितेश कुमार, तत्कालीन पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, रंजनकुमार शर्मा, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ४, शशिकांत बोराटे, सहा. पोलीस आयुक्त, खडकी विभाग, पुणे, श्रीमती आरती बनसोडे यांचे मार्गदर्शनाखाली खडकी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. राजेंद्र सहाणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री.मानसिंग पाटील, पोलीस उप-निरीक्षक, वैभव मगदुम, संतोष भांडवलकर, सर्वेलन्स पथकाचे पोलीस अंमलदार, रमेश जाधव, महिला पोलीस अमंलदार, किरण मिरकुटे व स्वाती म्हस्के यांनी केली आहे.
पोलीस आयुक्त, पुणे शहर, रितेश कुमार यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचा कार्यभार स्विकारल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवून शरीराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व समाजामध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश दिले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मकोका अंतर्गत केलेली ही ९० वी कारवाई आहे.

