पुणे, दि. २९ : समाजकल्याण विभाग व पुणे जिल्ह्यातील तृतीयपंथी व्यक्तींसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने १ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता तृतीयपंथी व्यक्तींसाठी मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले असून या रॅलीचा शुभारंभ भिडेवाडा, बुधवार पेठ, पुणे येथून होणार आहे, अशी माहिती समाज कल्याण विभागाने दिली आहे.
मतदान जनजागृती रॅलीचा मार्ग भिडेवाडा, बुधवार पेठ-महात्मा फुले मंडई- बाजीराव रोड असा असून रॅलीचा समारोप शनिवार वाडा येथे होणार आहे. या रॅलीत जास्तीत जास्तीत सामाजिक संस्था व व्यक्तींनी सहभागी होण्याचे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण विशाल लोंढे यांनी केले आहे.