पुणे-: महाराष्ट्रामध्ये १५ वर्षांपुढील वयोगटातील २४ टक्के लोक लठ्ठ असल्याचे लॅन्सेटचा अहवाल सांगतो. पुण्यातील रहिवाशांची वाढती टक्केवारी वजन जास्त असण्याच्या आणि लठ्ठपणाच्या गटात मोडते. तरूण महिलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वाढत असताना तरूण लठ्ठ महिलांवरील आणखी एका अहवालामधील निष्पत्तींमधून निदर्शनास येते की, तरूण महिला वाढत्या वजनासंदर्भात आरोग्यदायी राहण्याऐवजी आकर्षक लुकला प्राधान्य देण्याचा ट्रेण्ड सध्या सुरू आहे. वर्ल्ड ओबेसिटी डे अर्थात जागतिक लठ्ठपणा विरोधी दिनाच्या औचित्याने डॉक्टर्स लठ्ठपणा आणि हृदयाचे आरोग्य यांतील आंतरसंबंध अधोरेखित करतात व अतिस्थूलता वा लठ्ठपणा आणि त्याअनुषंगाने येणारे इतर आजार यांच्याविषयी जागरुकता वाढविण्याची आवश्यकता ते ठळकपणे मांडतात. लठ्ठपणावरील, विशेषत: महिलांच्या बाबतीत या समस्येवरील हस्तक्षेप लवकरात लवकर सुरू करण्याच्या गरजेवर ते भर देतात.
सह्याद्री हॉस्पिटलमधील कॅथ लॅबच्या डिरेक्टर डॉ. प्रिया पालिमकर ही बाब तपशीलात समजावून सांगतात, “लठ्ठपणा आणि हृदयविकाराचा झटका किंवा कोरोनरी आर्टरी डिजिज यांचा वाढता धोका यांच्यातील संबंध सुस्थापित आहेत. शरीरातील अतिरिक्त मेदामुळे अशा काही जैविक बदलांना निमित्त मिळते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांध्ये प्लाकचा थर साचण्याचा धोका आणखी वाढतो, ज्यामुळे अंतिमत: हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
विशेषतः स्त्रियांमध्ये, ही लक्षणे पुसट आणि नजरेतून सहज सुटून जावीत अशी असतात. पुरुषांच्या बाबतीत सर्वसाधारणपणे छातीत दुखणे हे लक्षण जाणवते त्याउलट ब्लॉकेज असलेल्या महिलांमध्ये असाधारण लक्षणे जाणवतात.” ‘यामुळे या आजाराचे लवकर निदान होणे अवघड बनते.” डॉ. प्रिया पुढे सांगतात, “अशा संदिग्ध लक्षणांच्या आड खरी समस्या लपून जाते, त्यामुळे केवळ महिलांमध्ये दिसून येणाऱ्या, हार्मोन्सच्या पातळीतील बदलांसारख्या असाधारण धोकादायक घटकांना समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.”
महिलांनी आपल्या या आगळ्यावेगळ्या लक्षणांविषयी जागरुक असले पाहिजे आणि हृदयविकाराची शक्यता कमी करण्यासाठी आवश्यक ती पाउले उचलली पाहिजेत. घामाघूम होणे, मळमळणे, चक्कर आल्यासारखे वाटणे किंवा अचानकपणे थकवा जाणविणे ही वरकरणी हृदयविकाराची ठराविक लक्षणे वाटत नाहीत, मात्र स्त्रियांमध्ये ती सरसकट दिसून येतात. दुर्दैवाने महिलांना हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे जाणवू लागतात तेव्हा बरेचदा त्यांचा चुकीचा अर्थ लावला जातो. याचे कारण महिलांमध्ये दिसणारी लक्षणे ही अस्पष्ट असतात. यात धाप लागणे, मळमळणे किंवा उलटी होणे आणि पाठ किंवा जबडा दुखणे अशा लक्षणांचा समावेश होतो. इतर महिलांना गरगरल्यासारखे वाटू शकते, छातीच्या खालच्या भागात किंवा पोटाच्या वरच्या भागात वेदना जाणवू शकतात किंवा प्रचंड थकल्यासारखे वाटू शकते.
या समस्यांवरील प्रभावी उपचारांसाठी आणि व्यवस्थापनासाठी लवकरात लवकर निदान होणे अत्यावश्यक असते. लठ्ठपणा आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी डॉ. प्रिया संतुलित आहाराचा समावेश असलेली निरोगी जीवनशैली स्वीकारण्याचा आणि ताणतणावांचे व्यवस्थापन करण्याचा सल्ला देतात. साखरेच्या पेयांना पर्याय शोधणे आणि झोपेला प्राधान्य देणे यांसारख्या छोट्या-छोट्या बदलांचाही मोठा प्रभाव पडू शकतो. गंभीर स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये अँजिओप्लास्टी सारखी प्रक्रिया जी उच्च यश दराने केली जाऊ शकते, ज्यामध्ये शरीराचा लहानात लहान छेद घेऊन केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया करून घेण्याचा सल्ला दिला जातो. लठ्ठपणा असलेल्या तरुण महिलांमध्ये कोरोनरी आर्टरी डिसीज (CAD) चे निराकरण करण्यासाठी मेटल-लेस अँजिओप्लास्टीचे उदयोन्मुख तंत्र, बायोरिसॉर्बेबल स्कॅफोल्ड्स (BRS) ज्याला विरघळणारे स्टेंट असेही म्हणतात आणि ड्रग-कोटेड बलून (DCB) चा वापर यामधून कार्डियोलॉजीमधील मोठी प्रगती दिसून येते. कायमस्वरूपी इम्प्लांट न ठेवण्याच्या क्षमतेसह ही उपचारपद्धती धमन्यांचे कार्य पूर्ववत करते, तसेच भावी उपचारांसाठी मार्ग सुलभ करते.