बारामतीत ‘मराठी टीव्ही सिरियल्स’ रंगणार …? सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना टोला
पुणे-मी माझ्या नवऱ्याच्या नावावर मत मागत नाही, असा टोला सुप्रिया सुळे यांनी नाव न उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना लगावला. पुण्यात त्या महिला कार्यक्रमात बोलत होत्या.सुप्रिया सुळे म्हणाल्या की, संसदेत माझा नवरा येत नाही. पण ज्याला उत्साह आहे. त्याने बायको संसदेत गेली की, कॅन्टीनमध्ये बसायचे पर्स घेऊन. संसदेत नोटपॅड लागते पर्स नाही. पर्समधून कोठे पैसे देणार आहात? तिथे नोटपॅड, पेन लागतो. नवऱ्याला त्या एरियामध्ये परवानगी नसते. हे लक्षात ठेवावे, असा टोला लगावत अजित पवारांना डिवचलं.
खासदार संसदेत बोलणारा पाहिजे की, इथे नवरा बोलणारा पाहिजे?
सुप्रिया सुळे म्हणाल्या, तुम्हाला खासदार संसदेत बोलणारा पाहिजे की, इथे नवरा बोलणारा पाहिजे? त्यामुळे विचार करुन मतदान करा. सदानंद सुळेंनी कितीही उत्तम भाषण केले, तरी मलाच संसदेत जाऊन बोलायचं आहे. माझं घर खासदारकीवर चालत नाही. मी माझ्या नवऱ्याला सांगितलंय की तुमचे इकडे काम नाही. आमचं लग्न म्हणजे आती क्या खंडाला..खंडाळ्याच्या खाली नवरा आणि वरती तुम्ही तुम्हाला माझ्या नवऱ्याने इथे भाषण केलेले चालेल का? संसदेत मी जाणारे की माझा नवरा जाणार आहे.
महाराष्ट्रात 48 खासदार आहेत. 10 विरोधात आहेत आणि 38 त्यांच्या बाजूने आहेत. 38 पैकी एकाने तरी महागाईचा म तरी काढलाय का? तिथे चुपचाप बसतात आणि पीएम मोदींचे कौतुक करत बसतात. त्यांचा महागाई, बरोजगारी आणि कोयता गँगशी काहीही संबंध नाही, असेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 15 लाख देतो म्हटले. आले का? पैसे आले असते तर माझे भाषण ऐकायला आला नसता. महागाई कमी झाली नाही. हे भ्रष्ट आहेत जुमलेबाज आहेत. 10 वर्षांपासून फसवाफसवी सुरु आहे. गोपीनाथ मुंडे साहेबांचे आयुष्य भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी गेलं. भ्रष्ट अशोक चव्हाणांना तुम्ही पदं देतात. मात्र, पंकजा मुंडेंना काहीच मिळत नाही, असा आरोप सुळे यांनी केला.