गुरुग्राम – एयर इंडिया या आघाडीच्या जागतिक विमानकंपनीने आज ‘सेफ्टी मुद्राज’ हा कंपनीचा नवा इनफ्लाइट सेफ्टी व्हिडिओ लाँच केला. या व्हिडिओमध्ये भारताच्या समृद्ध संस्कृतीच्या माध्यमातून सुरक्षेशी संबंधित सर्व सूचना मांडण्यात आल्या आहेत. मॅककॅन वर्ल्डग्रुपचे प्रसून जोशी, शंकर महादेवन आणि भारतबाला या प्रख्यात त्रयीच्या कल्पनेतून साकारलेला हा व्हिडिओ प्रवाशांचे लक्ष वेधून घेण्यासाठी खास तयार करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय संस्कृतीचे वैविध्य दर्शवत सुरक्षेशी संबंधित माहिती देण्यात आली आहे.
प्राचीन काळापासूनच भारतीय शास्त्रीय नृत्य आणि लोककलेचे प्रकार कथाकथन तसेच मार्गदर्शनासाठी वापरले गेले आहेत. एयर इंडियाच्या या नव्या इनफ्लाइट सेफ्टी व्हिडिओमध्ये मुद्रा किंवा नृत्याभिनयातून सुरक्षेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी भरतनाट्यम, बिहू, कथक, कथकली, मोहिनीअट्टम, ओडिसी, घूमर आणि गिद्ध अशा देशाच्या विविध भागातील आठ नृत्यप्रकारांचा वापर करण्यात आला आहे. प्रत्येक नृत्यप्रकारातून सुरक्षेशी संबंधित सूचना, महत्त्वाची माहिती आकर्षक आणि सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न पद्धतीने मांडण्यात आली आहे.
एयर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय कॅम्पबेल विल्सन विल्सन म्हणाले, ‘देशातील प्रमुख विमानवाहतूक कंपनी आणि भारतीय कला व संस्कृतीची पाईक या नात्याने एयर इंडियाला सुरक्षेशी संबंधित महत्त्वाच्या सूचना भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाच्या माध्यमातून जगभरातील प्रवाशांपर्यंत पोहोचवताना आनंद होत आहे. आमच्या प्रवाशांना हे इनफ्लाइट सेफ्टी व्हिडिओ जास्त लक्षवेधक आणि माहितीपूर्व वाटतील. त्याचप्रमाणे विमानात प्रवेश केल्या क्षणापासून ते भारतीयत्वाची प्रचिती देतील.’
ग्रॅमी पुरस्कार विजेते संगीतकार आणि गायक शंकर महादेवन यांचे संगीत लाभलेला हा व्हिडिओ प्रवाशांना सुरक्षा व सेवा यांचा अनोखा मिलाफ अनुभवण्याची संधी देईल. सहा महिने चाललेल्या या प्रकल्पादरम्यान क्रिएटर्सनी विविध ठिकाणी प्रवास करत दृश्य अनुभव घेत या व्हिडिओसाठी प्रेरणा घेतली.
हा सेफ्टी व्हिडिओ सुरुवातीला एयर इंडियाच्या नुकत्याच दाखल झालेल्या A350 विमानात उपलब्ध केला जाणार असून त्यात अत्याधुनिक इनफ्लाइट मनोरंजक स्क्रीन्सचा समावेश असेल. त्यानंतर एयर इंडियाच्या ताफ्यातील इतर विमानांमध्ये त्यांचा समावेश केला जाईल.
एयर इंडियाचा नवा इनफ्लाइट सेफ्टी व्हिडिओ इथे डाउनलोड करता येईल – : https://bit.ly/AirIndiaSafetyVideo
प्रतिक्रिया
प्रसून जोशी, अध्यक्ष मॅककॅन वर्ल्डग्रुप एशिया पॅसिफिक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सीओओ मॅककॅन वर्ल्डग्रुप इंडिया आणि प्रसिद्ध लेखक व गीतकार
‘प्रवाशांचे लक्ष गुंतवून ठेवणारी, भारतीय संस्कृतीची अनुभूती देणारी आणि जागतिक पातळीवर एयर इंडियाचा ब्रँड उंचावणारी संकल्पना तयार करणं आव्हानात्मक होतं. अत्यावश्यक माहिती देण्यासाठी व भावनांना साद घालणारं काहीतरी शोधण्यासाठी आम्ही नेटाने प्रयत्न केले. भारतीय शास्त्रीय नृत्याला कथाकथनाचा अनोखा आयाम लाभलेला आहे. त्यातूनच मला भारतीय नृत्यप्रकारांच्या मदतीने विमानप्रवासात सुरक्षेविषयक सूचना देणारा व्हिडिओ तयार करण्याची संकल्पना सुचली.’
एयर इंडियाच्या सक्षम टीमला ही संकल्पना आवडली याबाबत मी स्वतःला सुदैवी समजतो. माझे जुने मित्र आणि अतिशय बुद्धीमान भारतबाला यांनी हा विचार प्रत्यक्षात आणला. एयर इंडियासह काम करण्याची संधी मिळणं हे मॅककॅनसाठी अभिमानास्पद आहे.’
प्रसिद्ध भारतीय संगीतकार आणि गायक शंकर महादेवन –
‘एयर इंडियाच्यासुरक्षा सूचना देणाऱ्या व्हिडिओसाठी संगीत तयार करण्याची संधी मिळाल्याचा मला आंद वाटतो. एयर इंडियाच्या प्रवासात नवा अध्याय सुरू होत असताना त्यांचा इनफ्लाइट सेफ्टी व्हिडिओ क्रांतीकारी आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध ठरणारा आहे. या व्हिडिओमध्ये भारतातील विविध नृत्यप्रकारांची सांगड घालण्यात आली असून नृत्य कलाकारांनी मुद्रांच्या माध्यमातून सुरक्षेच्या सूचना दिल्या आहेत. नृत्यप्रकाराबरोबर संगीतही बदलत जातं. अशाप्रकारे काहीतरी अनोखं तयार केल्याबद्दल एयर इंडियाचं कौतुक करायला हवं. या प्रकल्पाचा भाग असल्याचा मला अभिमान वाटतो.’
भारतीय सिने दिग्दर्शक, निर्माते आणि स्क्रीनरायटर – भारतबाला
‘भारतातीलसांस्कृतिक वैविध्य दर्शवणाऱ्या प्रकल्पांवर पूर्वी काम केलेलं असल्यामुळे एयर इंडियाकडून आलेल्या या संधीनं मला अभिजात शास्त्रीय आणि लोककला आधुनिक दृष्टीकोनातून मांडणं शक्य केलं. आपला भारत प्रगत धोरण असलेला प्राचीन देश आहे. एयर इंडियासारख्या भारताच्या जागतिक दर्जाच्या विमानवाहतूक कंपनीसाठी अशाप्रकारे सुरक्षेच्या सूचना मांडण्याची ही संधी काहीतरी भव्यतयार करण्याची जबाबदारी वाढवणारी होती. निसर्गरम्य ठिकाणं आणि डोंगराळ प्रदेशात शूटिंग करणं आणि प्रत्येक नृत्यप्रकार तितक्याच अभिमानानं सादर करणंसमृद्ध करणारं होतं. या व्हिडिओमुळे प्रवाशांना भारत दृश्य, सांगीतिक, भावनिक स्वरुपात आणि मोठ्या पटावर समजून घेता येईल. ही फिल्म माझ्या सगळ्यात खास निर्मितींपैकी एक आहे आणि मला आशा आहे, की त्यामुळे एयर इंडियाच्या समृद्ध वारशामध्ये मानाचा तुरा खोवला जाईल. या हवाई प्रवासात तुमचे स्वागत आहे.’
एयर इंडियाच्या नव्या इनफ्लाइट सेफ्टी व्हिडिओविषयी
‘सुरक्षा मुद्रा: मुद्रा या हिंदी शब्दाचा अर्थ होतो, हातांनी दर्शवलेले भाव. हा भारतीय शास्त्रीय नृत्यप्रकारांचा महत्त्वाचा पैलू असून तो नव्या इनफ्लाइट सेफ्टी व्हिडिओमध्ये वापरण्यात आला आहे.
व्हिडिओविषयी: या व्हिडिओच्या सुरुवातीला एयर इंडियाचे केबिन क्रु सदस्य एका तरुण स्त्रीचे स्वागत करताना दिसतात व तिचे लक्ष एयर इंडिया व्हिस्ता (सोनेरी विंडो फ्रेम जी गेल्या वर्षी एयर इंडियाच्या नव्या जागतिक ब्रँड प्रतिमेचा महत्त्वाचा भाग म्हणून लाँच करण्यात आली होती) ती उत्सुकतेनं ‘व्हिस्ता’मध्ये डोकावून पाहाते आणि एक जादुई सांस्कृतिक खजिना तिच्यापुढे उलगडतो.
पहिल्या दृश्यात भरतनाट्यम नृत्य समोर येतं आणि सीट बेल्ट व केबिन बॅगेजसाठी सूचना देतं. त्यानंतर ही कथा अभिरूचीपूर्ण पद्धतीने पुढे सरकते आणि समुद्रकिनार्यावर ओडिसीचं दर्शन होतं. ओडिसीच्या माध्यमातून सीट्स व ट्रे टेबल्सच्या सुरक्षेबद्दल सूचना दिल्या जातात.
त्यानंतर केरळच्या बॅकवॉटर्सच्या पार्श्वभूमीवर कथकली आणि मोहिनीअट्टमद्वारे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स न वापरण्याच्या व विमानात धूम्रपान न करण्याच्या सूचना देतात. कथ्थकद्वारे इमरजन्सी एक्झिट व ऑक्सिजन मास्कविषयी सांगितलं जातं.
सेफ्टी जॅकेटच्या सूचना आसामच्या बिहू नृत्य कलाकारांच्या रसरशीत सादरीकरणातून दिल्या जातात व त्यानंतर जयपूरचं घूमर सुरक्षा व संस्कृतीच्या या मिलाफाला आकर्षक आयाम देतं.
अखेर प्रवाशांना थेट पंजाबच्या शेतात गिद्द नृत्यकलाकारांचं सादरीकरण पाहायला मिळतं आणि त्यातून सेफ्टी कार्डचं महत्त्व सांगितलं जातं.
श्रेय:
· संकल्पना – प्रसून जोशी, मॅककॅन वर्ल्डग्रु इंडिया
· संगीत – शंकर महादेवन
· दिग्दर्शक – भारतबाला
· फोटोग्राफी दिग्दर्शक – मार्क कोनिनक्स
· नृत्यदिग्दर्शक – वृंदा मास्तर