पुणे-मोबाईल चोरीचा संशय घेत दोघांनी एका तरुणास आणि तरुणीला केलेल्या जबर मारहाणीत तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी बुधवार पेठेतील श्रीनाथ टॉकीज समोरील चौका नजीक घडली. वर्षा शिवाजी थोरात, (वय-२५, रा.१३२, दांडेकर पुलाजवळ, पर्वती, पुणे )असे या मारहाणीत मृत्यू पावलेल्या तरुणीचे नाव आहे. आनंद सोनवणे(वय-३० वर्षे, रा. ३१४, ढमढेरे बोळ, बुधवार पेठ, पुणे) याने याप्रकरणी पोलिसात फिर्याद नोंदविली आहे.
फरासखाना पोलिसांनी भादविक ३०२,३२४,३२३,३४ अन्वये दोन अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. हि घटना आज
दि.१२/०२/२०२४ रोजी सकाळी ०८/३० वा. श्रीनाथ टॉकीज चौकाचे समोर बुधवार पेठ, पुणे यथे घडली
यातील फिर्यादी व मयत वर्षा शिवाजी थोरात याठिकाणी चहा पिण्यासाठी गेले असता, यावेळी दोघं इसमांनी आपसात संगनमत करून, फिर्यादी व महिला वर्षा थोरात यांनी त्यांचा मोबाईल चोरी केला असल्याचे संशयावरून फिर्यादी यांना मारहाण करून जखमी करून, तसेच महिला वर्षा थोरात यांनाही बांबुने जबर मारहाण करून, तीस गंभीर जखमी करून, तीचा खुन केला आहे. सहाएक पोलीस निरीक्षक गायकवाड ९९२१०९००४४ अधिक तपस करत आहेत.