ललित कला केंद्र प्रकरण –निखील वागळे हल्ला आणि अॅट्राॅसिटी तक्रारीचा फसलेला प्रयत्न
केवळ नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचे यश आपल्या अडाणीवृत्तीने अपयशाकडे नेऊ नका
पुणे- पंतप्रधान मोदींच्या दालनात थेट यांना प्रवेश असतो, कोणी अडवत नाही,प्रख्यात सेवक आहेत असा ज्यांनी प्रचार सुरु करून,ज्यांनी स्थानिक कोणत्याही कार्यकर्त्याला नेत्याला बरोबर न घेता पुणे लोकसभेच्या रिंगणात इच्छुक नव्हे भाजपचा तर मीच भाजपचा उमेदवार म्हणून अशा जनमानसात ओळखही नसलेल्या तथाकथित नेत्याने उडी घेतली आणि या वातावरणात काही कार्यकर्त्यांना स्वतःकडे खेचून घेतल्यावर अगदीच टोक गाठले त्यास नुकतेच नवी दिल्लीत बोलावून केंद्रीय नेत्याने चांगलेच सुनावल्याचे वृत्त पुण्यात पसरले आहे. हे नेते हात तोंडाला आलेला निवडणुकीतील विजय पराभवाकडे नेण्यास कारणीभूत ठरतील असा दावा आता कार्यकर्ते करू लागलेत पण पक्ष शिस्त म्हणून आपल्या नावानिशी जाहीर बोलता येत नसल्याने त्यांची कुचंबना होताना दिसते आहे.
भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला स्वाभिमान वाटावा,गर्व चढावा असे नेतृत्व त्यांच्या वाट्याला आले आहे. त्या नेतृत्वामुळे निवडणुकीत विजयाच्या जवळपास आपण आहोत हे विसरू नका आणि अशा अवस्थेत तुम्ही पक्षाची हानी करणारी कृत्ये केली तर परिणामाला सामोरे जावे लागेल अशी तंबी भरल्याचे वृत्त येथे पसरले आहे. रावणाला रामाने मारले हे निमित्त होते.त्याला त्याच्या अहंकाराने मारले.परंतु रामाच्या विचारधारेचे ‘आम्ही प्रतिनिधित्व ‘करतो असा अभिमान बाळगणारे कार्यकर्ते जर त्या दंभाने आणि अहंकाराने प्रेरित झाले तर जनता आपले मुस्काड फोडेल हे लक्षात ठेवले पाहिजे असेही काही कार्यकर्ते बोलू लागलेत.
निखिल वागळे यांच्यावर झालेला हल्ला हा याच अहंकाराचा परिपोष आहे .परवा पुण्यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी नियोजित पणे चार वेगवेगळ्या चौकात गाठून पाठलाग करत त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला,त्यांच्या गाड्यांच्या काचा फोडल्या,चार लोक गाडीत असताना वरून बेदम पणे काठ्या,अंडी आणि दगडे त्या गाडीवर मारली,हे उद्दामपणाचे, अहंकाराचे लक्षण जनतेला दिसले.पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षासारख्या शुचिर्भूत मानल्या जाणाऱ्या कार्यकर्त्यांकडूनअप्रत्यक्षपणे पक्षादेश असल्याच्या अविर्भावात अशी घटना घडणे हे केंद्रीय नेतृत्वाला मानवनारे नाही असे सांगितले जाते.
भाजपने सध्या गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात एका पाठोपाठ धार्मिक कार्यक्रम घेणे सुरु केले आहे. हे कार्यक्रम करून हिंदू समाजाला सहिष्णुतेच्या आणि संस्कृती रक्षकाच्या भूमिकेतून स्वतःला पुढे आणत असताना दुसरीकडे कोणत्याही अमानवीय घटना घडता कामा नये याचीही दक्षता घेतली पाहिजे.केवळ नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा वापर करून सांस्कृतिक,कला,नाट्य याचे भरगच्च कार्यक्रम भरवा,गर्दीचा मेळावा दाखवा..पण त्यापुढेही सामान्य माणसाचे काही प्रश्न आहेत,त्यांच्या विवंचना आहेत त्याकडे लक्ष देऊन पंतप्रधानांच्या सर्व योजना त्यांच्यापर्यंत कशा पोहोचविता येतील हे पाहण्या ऐवजी अन्य भेदभावी उग्र कर्मे यांना टाळणे तेवढेच जरुरीचे आहे असे सांगितले जाते आहे.