पिंपरी (दि.१० फेब्रुवारी २०२४) जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर शुक्रवारी पुण्यात भाजप कार्यकर्त्यांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यातून ते बालंबाल बचावले. वागळे यांच्यावरील हल्ला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला आहे. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. पत्रकारांवरील हल्ला म्हणजे लोकशाहीवरील हल्ला आहे. पुरोगामी महाराष्ट्रात लोकशाहीवरील हल्ला खपवून घेतला जाणार नाही. निखिल वागळे लोकशाही मार्गाने आपले विचार जनतेपुढे मांडत आहेत. गाडी फोडून, निखिल वागळे यांच्यावर हल्ला करणे या पद्धतीने त्यांच्या विचारांना विरोध करणे निषेधार्ह आहे. या प्रवृत्तीचा पिंपरी चिंचवड श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष सुनील लांडगे यांनी निषेध केला आहे.